घरताज्या घडामोडीमुंबईत भिंतीच्या बांधकामासाठी झाडांच्या मुळावर घाव, कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल

मुंबईत भिंतीच्या बांधकामासाठी झाडांच्या मुळावर घाव, कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल

Subscribe

जोगेश्वरी (पूर्व) येथे इस्माईल युसूफ काॅलेज जवळ भिंतीच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने खोदकाम करताना तीन झाडांच्या मुळांचे नुकसान केल्याने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पालिकेच्या वार्ड कार्यालयातील उद्यान विभागाने सदर जागा मालक म्हणून इस्माईल युसूफ काॅलेज व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
जोगेश्वरी (पूर्व) येथे इस्माईल युसूफ काॅलेज परिसरात सध्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र या भिंतीचे काम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने ताडगोळ व वाळवा या झाडांच्या जवळ खोदकाम करताना सदर झाडांच्या मुळावर घाव घातल्याने मुळांचे नुकसान झाले आहे. त्याचा कदाचित झाडांच्या आयुष्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या घटनेमुळे सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात तक्रारदार प्रदीप जाधव यांच्याकडून जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्यांनीच या घटनेची माहिती पालिकेकडे दिली. सदर जागा ही इस्माईल युसूफ काॅलेजची असल्याने व्यवस्थापनाला पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मुंबईसह राज्यात विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर मेट्रो रेल्वे कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीवरून पर्यावरणवाद्यांनी विरोध करीत रान उठवले होते. सध्या मुंबईत इमारत बांधकाम, नाला रुंदीकरण, रस्ता रुंदीकरण आदी कामांसाठी बऱ्याचदा झाडांची कत्तल करण्यात आली असून त्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येते. मात्र शक्यतो झाडांची कत्तल रोखण्याचा, झाडांचे पुनरोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या झाडांचा बळी दिला जातो, त्या बदल्यात अन्य झाडे लावण्यात येतात.

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व असून झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. त्यामुळे झाडांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NPPA ANNOUNCES : १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषध महागणार, ११ टक्के किंमत वाढीची घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -