घरमहाराष्ट्रशस्त्र परवानाधारकांनासाठी 'ही' डेडलाईन महत्त्वाची

शस्त्र परवानाधारकांनासाठी ‘ही’ डेडलाईन महत्त्वाची

Subscribe

शस्त्र परवानाधारकांना UIN (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) क्रमांक प्राप्त करून घेण्याची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

केंद्र शासनाकडील अधिसुचना ३ ऑगस्ट अन्वये शस्त्र नियम २०१६ मधील नियम क्र. १५ मध्ये सुधारणा करण्यात आली असून शस्त्र परवानाधारकांना UIN (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) क्रमांक प्राप्त करून घेण्याची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपल्या शस्त्र परवान्याची माहिती NDAL-ALIS या संगणक प्रणालीमध्ये भरून UIN क्रमांक प्राप्त झाल्याबाबतची माहिती आपण राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात व्यक्तीश: उपस्थित राहून करून घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.

हे नियम पाळावे लागतील 

अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, ‘सर्व शस्त्र परवानाधारकांची ३१ मार्च २०१९ पूर्वी NDAL-ALIS या संगणक प्रणालीमध्ये माहिती भरून UIN नंबर प्राप्त करून घेणे अनिवार्य केले आहे. ज्या शस्त्र परवानाधारकांची माहिती NDAL-ALIS या संकेतस्थळावर भरून UIN क्रमांक प्राप्त झालेला नाही, अशा परवानाधारकांनी आपण राहत असलेल्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये १५ मार्च २०१९ अखेर विहीत नमुन्यातील फॉर्म, आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो, सहीचा नमुना, शस्त्र परवान्याची छायांकित प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून UIN क्रमांक प्राप्त करून घ्यावा. ज्या शस्त्र परवानाधारकांनी UIN क्रमांक प्राप्त घेतला नाही त्यांचा परवाना ३१ मार्च २०१९ नंतर भारतीय शस्त्र नियम २०१६ मधील नियम क्र. १५(२) अन्वये अवैध ठरविले जातील याची सर्व शस्त्र परवानाधारकांनी नोंद घ्यावी. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित परवानाधारकांची असणार आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -