घरपॉझिटिव्ह न्यूजसत्तर वर्षाच्या बस आगाराचा कायापालट होणार

सत्तर वर्षाच्या बस आगाराचा कायापालट होणार

Subscribe

विकासासाठी आराखडे आणि नकाशांना मंजुरी

कल्याण । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कल्याण बस आगाराला 60 ते 70 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. अत्यंत धोकादायक झालेल्या या आगाराचे आत्ता रुपडे पालटणार असून याबाबत महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने जागेच्या विकासासाठी आराखडे आणि नकाशांना मंजुरी दिल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत आता नव्याने या बस आगाराचा कायापालट होणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण शहरात प्रकल्पाचे जोरकसपणे काम सुरू असल्याने कल्याण स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर महामंडळाचे जीर्ण व धोकादायक स्थितीत असलेले बस आगार स्मार्ट सिटीत अडथळयाचा विषय बनून राहिला आहे. कल्याण स्टेशन सुधारणा प्रकल्पातील नूतनीकरणात व बस आगार नव्याने बांधण्यात चार वर्षांपूर्वी राज्य परिवहन मंडळाने ना हरकतीबाबत स्मार्ट सिटी संचालकांना लेखी स्वरूपात मान्यता दिली होती. परिवहन महामंडळाकडून 9 डिसेंबर 2022 रोजी कल्याण रेल्वे स्थानक परिसरामधील वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून विविध आस्थापना बांधण्यास संकल्पिय आराखडयास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

कल्याण बस आगार 17719 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत पूर्वी बांधण्यात आले होते. नूतनीकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने कार्यालय लेखा विभाग डेपो व्यवस्थापक, प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, वॉशिंग एरिया, मेकॅनिकल एरिया, इंधन पंप, यूपिटस, थ्रूपिटस, 18 फलाट, बस स्थानक, तळमजला बस स्थानक, तळमजला व्यावसायिक इमारत व बस आगाराचा परिसर तसेच 81 बसेस साठी नाईट पार्किंगची सुविधा या आराखड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कल्याण स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करणे सुसह्य होण्याच्या दृष्टीने स्टेशन समोर बैल बाजार चौक ते नेताजी सुभाष चंद्र बोस चौक हा सुमारे 1100 मीटर लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस एसटी डेपो मध्ये जाणे येण्यासाठी स्वतंत्र मार्गीका प्रस्तावित आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस चौक मार्गे बैल बाजार दिशेने येणारी वाहतूक समोरून भानुसागर थिएटर मार्गे कल्याण बैल बाजार स्मशानभूमी येथे एक दिशा मार्ग असणार आहे.
गेल्या 60 ते 70 वर्षापासूनचे हे बस आगार भगनावस्थेत असतानाही तक धरून धोकादायक स्थितीत उभे होते. बस आगाराच्या इमारतीला तडे गेल्याने प्रवाशांसाठी ती धोकादायक ती धोक्याची घंटा समजली जात होती. नव्याने बांधण्यात येणारे या बस आगारात सर्व संयुक्त व्यवस्था आराखड्यात मंजूर करण्यात आल्याचे स्मार्ट सिटी कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांने यांनी माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -