घरताज्या घडामोडीजालन्यात ऑनर किलिंग! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या

जालन्यात ऑनर किलिंग! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या

Subscribe

जालन्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या बापानं तिची हत्या केली. क्रूर बापाने मुलीला गळफास दिला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवात लावण्यासाठी तीचा मृतदेह जाळून टाकला. ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगावमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकला संतोष सरोदे असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. सूर्यकला ही तिच्या नात्यातील मुलासोबत पळून गेली होती. लग्न करून देतो असे सांगून तिच्या वडिलांनी तिला परत बोलावले. तीन दिवसांनंतर मुलगी घरी परतली. तिच्या लग्नाची सर्व तयारी आजूबाजूच्या मर्यादित नातेवाईकांसह केली गेली होती.

- Advertisement -

मात्र, लग्नापूर्वी तिचे वडील संतोष सरोदे आणि काका नामदेव सरोदे यांनी तिला मंडपातून घराजवळील झाडावर ओढून नेले. त्यानंतर त्यांनी तिच्या गळ्याला दोरी बांधून तिला झाडाला लटकवले. तसेच तिच्या मृतदेहाची विल्हेवात लावण्यासाठी तीचा मृतदेह जाळून टाकला. या घटनेची माहिती पोलिसांना बुधवारी मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली.

कुटुंबातील कोणीही या कृत्याला विरोध केला नाही. गावातील कोणीतरी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : येत्या रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -