घरमहाराष्ट्रएसटी अपघात टळला

एसटी अपघात टळला

Subscribe

२८ प्रवाशांचा जीव वाचला

कंटेनरला बसणारी धडक टाळण्यासाठी एसटी बसचालकाने तातडीने ब्रेक दाबल्याने अनियंत्रित झालेली बस रस्त्यावरून घसरली. ही घटना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी घडली. सुदैवाने चालक-वाहकासह 28 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

ही बस (एमएच 14 बीएल 9389) मुंबईहून पंढरपूरकडे निघाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास बस खालापूर हद्दीत विणेगावानजीक आली असताना कमल हॉटेलसमोर कंटेनर अचानक थांबला. त्यामुळे बसचालक प्रवीण मरसोलकर यांनी कंटेनरला धडक बसू नये यासाठी तातडीने ब्रेक दाबला असता बस रस्त्यावरून घसरत बाजूपट्टीवरून गटारात कलंडली. सुदैवाने बस पलटी न झाल्याने मोठा अपघात टळला.

- Advertisement -

अपघातप्रसंगी बाहेर पडण्याच्या बसच्या मागील दरवाजातून प्रवाशांनी स्वतःची सुटका करून घेतली. अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याने दुसर्‍या बसमधून प्रवाशांना पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी चौक चौकीतून पोलीस नाईक प्रसाद पाटील, अजय मोहिते यांना मदतीसाठी रवाना केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -