घरअर्थजगत१.१५ कोटींची हिस्सेदारी विकून रिलायन्स होणार कर्जमुक्त

१.१५ कोटींची हिस्सेदारी विकून रिलायन्स होणार कर्जमुक्त

Subscribe

सौदी अरेबियाची अ‍ॅरॅमको आणि ब्रिटनची बीपी पीएलसी यांना १.१५ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी विकून रिलायन्स इंडस्ट्रीजला १८ महिन्यांत ’शून्य-शुद्ध कर्ज संस्था’ (झीरो-नेट डेब्ट फर्म) करण्यात येईल, अशी घोषणा रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली. आपल्या तेल आणि रसायन व्यवसायातील हिस्सेदारी रिलायन्स विकणार आहे, असे अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स समूहाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. अंबानी यांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या अ‍ॅरॅमकोला रिलायन्स ऑईल अँड केमिकल्स या कंपनीतील २० टक्के हिस्सेदारी विकली जाईल.

या हिस्सेदारीचे उद्यम मूल्य (इंटरप्राईज व्हॅल्यू) ७५अब्ज डॉलर आहे. ब्रिटनच्या बीपी समूहास कंपनीच्या पेट्रोलपंप आणि हवाई इंधन सुविधेतील ४९ टक्के हिस्सेदारी विकली जाईल. रिलायन्स समूहास बीपीकडून ७ हजार कोटी रुपये मिळतील.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, सौदी अरेबियाकडून येणारी ही गुंतवणूक रिलायन्स समूहाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक ठरणार आहे. तसेच भारतातीलही ती सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक ठरणार आहे. अ‍ॅरॅमको ही जगातील सर्वांत मोठी कच्चे तेल निर्यातदार कंपनी आहे. गुजरातेतील जामनगर येथील रिलायन्स जोड तेल शुद्धीकरण प्रकल्पास दररोज ५ हजार बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा अ‍ॅरॅमकोकडून केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -