घरमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्याने, आता अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार...

अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्याने, आता अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार केंद्रीय पद्धतीने

Subscribe

प्रवेश प्रक्रियासाठी 16 ऑगस्ट पासून अर्ज दाखल करण्यास सरुवात होणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.

उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे.अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) रद्द करण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. त्याचवेळी अकरावीचे प्रवेश हे दहावीच्या गुणावंरच आधारीत करण्यात यावेत असा आदेश देखील हायकोर्टाकडून देण्यात आल्या आहे. राज्य सरकारने केलेल्या सीईटी परीक्षेचा अध्यादेश रद्द करत हायकोर्टाने अत्यंत मोठा निर्णय दिल्याने २१ ऑक्टोबर रोजी होणारी सीईटी परीक्षा आता होणार नाही.  न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाई पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच या प्रवेश प्रक्रियेसाठी 16 ऑगस्ट पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.

गेल्या दहा वर्षापासून अकरावी प्रवेशासाठी पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. आता सीईटी रद्द झाल्याने थेट या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील असे वक्तव्य मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव यांनी केले आहे. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी या आधीच  एक पत्रक जारी करत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात लिहलं आहे की, ‘‘विद्यार्थी आणि पालकांमधील शंका कुशंका दूर करण्यासाठी, तसेच विद्यार्थांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सध्या जागृतीचा अभाव असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अनेकदा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधासाठी मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत आहे.’’

- Advertisement -
  • तसेच अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थांनी पुढील वेबसाईटला भेट द्यावी : https://11thadmission.org.in
  • प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

१) नोंदणी व अर्ज भरण्याची तारीख १६ ऑगस्टपासून

  • वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करणे. तसेच लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करणे.
  • अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि शुल्क भरणे
  • अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे, शाळा निवडणे आणि अर्ज व्हेरिफाइड झाल्याची खात्री करणे

२) १७ ऑगस्टपासून

- Advertisement -
  • विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाइन व्यवस्थित तपासून प्रमाणित करणे.

हे हि वाचा – मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल, मानसिक, शारीरिक छळाचा आरोप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -