घरताज्या घडामोडीराहुल गांधींनंतर आता रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या ५ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक

राहुल गांधींनंतर आता रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या ५ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) ५ वरिष्ठ नेत्यांचं ट्विटर (Twitter) अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने काल, बुधवारी केला आहे.

काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले होते की, ‘ट्विटरने माझे पण अकाऊंट लॉक केले आहे. कारण मी सुद्धा राहुल गांधींना महिला आणि दलितांच्या अत्याचाराविरोधात पाठिंबा दिला. लवकरच खऱ्याचे दिवस येतील आणि तुम्ही (ट्विटर) घाबरणार नाही. माझी ही भविष्यवाणी आहे.’

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सचिव प्रणव झा म्हणाले की, ‘राहुल गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी आणि जॅक (ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे), ट्विटरने रणदीप सुरजेवाला, अजय माकन, सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. याबाबत काँग्रेस विरोध दर्शवत आहे. सर्वांसोबत अन्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे.’

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी सस्पेंड करण्यात आलं होत. सरकारच्या दबावामुळे ट्विटरने राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर विरोध कारवाई केली, असा काँग्रेसने आरोप केला आहे.

यामुळे राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर झाली कारवाई

दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत. याच ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आली होती.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -