घरमहाराष्ट्रबाळासह गावी आलेल्या आईला प्रवेश नाकारला

बाळासह गावी आलेल्या आईला प्रवेश नाकारला

Subscribe

लहान बाळाला करोनाचा संसर्ग होऊ नये आणि आपल्या माणसांचा आधार मिळावा म्हणून एक महिला त्याला घेऊन आपल्या गावी आली. पण तिच्या स्वत:च्या कुटुंबानेच त्या महिलेसह तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला घरात प्रवेश नाकारला. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावात घडली आहे. पण, या महिलेचा पती सैन्यात असल्याने नवी मुंबईहून पोलिसांची परवानगी घेऊन ती महिला आपल्या बाळासह गावी आली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात नवी मुंबईतून तीन महिन्यांच्या बाळासह एक महिला गावात आली. पण घरच्यांनीच प्रवेश नाकारल्याने तिला जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन व्हावे लागले. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. पती सैन्यात असल्याने घरात करोनामुळे घाबरून गेलेल्या महिलेने नवी मुंबईहून तीन महिन्याच्या बाळासह गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची परवानगी घेऊन आपल्या सांगेली गावात आली. पती सैनिक असल्याने तिला सांगेली गावात सोडण्यासाठी पोलीस आले होते.

- Advertisement -

कुटुंबियांनी घरात घेतले नसल्याने तिला ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले. पती नसल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर भीती वाटू लागली म्हणून तिने आपले गावातील घर गाठले. पण घरातील मंडळींनी तिला प्रवेश देण्यास नाकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही महिला सांगेली गावात घरी आली, पण तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेतले नाही. तीन महिन्यांच्या बाळाला दूध तापवून देण्याचे देखील नाकारले.

काही दिवसांपूर्वीच एका कुटुंबातील व्यक्तीला करोना झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकण्याचा प्रकार समोर आला होता. अशा घटना ताज्या असताना अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लोकांचा असंवेदनशीलपणा समोर आला. कांदे विकायला नेणारा ट्रक पंक्चर झाल्याची संधी साधत लोकांनी शेतकर्‍याचे कांदे लुटल्याचा प्रकार समोर आला. आधीच शेतकरी संकटात आहे. लोकांच्या अशा वागण्याने तो अधिक संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -