घरमहाराष्ट्रखात्यातून पैसे काढण्याची मर्यादा एक हजारावरून आता १० हजार

खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा एक हजारावरून आता १० हजार

Subscribe

खातेदारांना आरबीआयचा दिलासा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएससी बँक) खातेदारांना थोडासा दिलासा दिला आहे. निर्बंधाच्या सहा महिन्यांच्या काळात बँकेतील खात्यातून काढू शकणार्‍या रक्कमेत १००० रुपयांहून १०,००० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेतील खातेधारक आता सहा महिन्यात १० हजार रुपये काढू शकतील. ज्यांनी एक हजार रुपये खात्यातून अगोदरच काढले आहेत त्यांना उरलेले नऊ हजार रुपये सहा महिन्यांच्या कालावधीत काढता येतील. असे आरबीआयने गुरूवारी स्पष्ट केल

महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बँकेेचे लाखो मतदार मोठ्या संकटात सापडले. या सहा महिन्यांच्या काळात आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, खातेधारकांची अडचण ओळखून आरबीआयने 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा वाढविली असून 10 हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे ज्या खातेधारकांनी 1 हजार रुपये काढले आहेत त्यांना सहा महिन्यात आणखी 9 हजार रुपये काढता येणार आहेत.

- Advertisement -

पीएमसी बँकेतील जवळपास 60 टक्के लोकांना मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांच्या खात्यांमध्ये 10 हजार किंवा त्यापेक्षा कमी पैसे आहेत. यामुळे या खातेधारकांना त्यांचे सर्वच पैसे काढून घेता येणार आहेत. मात्र, ही बंदी सहा महिन्यांची असल्याने अन्य खातेधारक त्यांच्या रकमा सहा महिन्यांनंतर काढू शकणार आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

पीएमसी बँकेविरोधात सोमय्यांची तक्रार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँकेविरोधात कडक कारवाई करण्याची विनंती आरबीआयला केली आहे. तसेच सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी, पीएससी बँकेतील ९.१२ लाख ठेवीदारांचा ऐवज बँकेतील टॉप मॅनेजमेंटमधील अधिकार्‍यांनी आणि इस्टेट फर्म एचडीआयएल कंपनीने लुटला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे म्हटले आहे. या तक्रारीचे प्रत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पाठवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -