घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ स्थगित; सुधीर गाडगीळांचा राजीनामा

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ स्थगित; सुधीर गाडगीळांचा राजीनामा

Subscribe

सांगलीमध्ये 4 ते 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत

सांगली: सांगलीमध्ये 4 ते 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ स्वागत समितीचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे यांनी दिली. तसंच, नाट्यसंमेलन स्वागताध्यक्षपदी असणाऱ्या सुधीर गाडगीळ यांनी आंदोलनामुळे राजीनामा दिला आहे. (The Maratha reservation movement the timing of the Marathi Natyasammelan has been postponed Sudhir Gadgil s resignation)

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 5 नोव्हेंबरपासून नाट्यपंधरी असलेल्या सांगलीत होणार होतं. यानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. तथापि, राज्यभर उसळलेल्या मराठा आंदोलनामुळे हे सर्व कार्यक्रम तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आहे.

- Advertisement -

रंगभूमिदिनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉक्टर जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची स्वागत समिती स्थापन करणयात आली होती. स्वागताध्यक्षपदी आमदार सुधीर गाडगीळ यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या तयारीसाठी समितीच्या बैठका झाल्या होत्या.

मराठी रंगभूमीदिनी राज्यव्यापी 100 वे अखिल भारतीय मराठा नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर होणार आहे. नाट्यपंढरीत नाट्यसंमेलनाची तयारी सुरू होती. विष्णूदास भावे गौरवपदक प्रदान समारंभ प्रतिवर्षी 5 नोव्हेंबरला होत असतो. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर सुरू झाला. आंदोलनाची धग राज्यभर असल्याने संमेलनाचा प्रारंभ करणे उचित नसल्याची भूमिका संयोजकांनी मांडली. त्यानंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

आमदार गाडगीळांचा राजीनामा

आमदार सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. सुधीर गाडगीळ म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असेलल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणं योग्य वाटत नाही.

(हेही वाचा: आव आणि साव हाच मोदी सरकारचा चेहरा आणि मुखवटा…, ठाकरे गटाची जहरी टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -