घरमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होईल - बाळासाहेब थोरात

विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होईल – बाळासाहेब थोरात

Subscribe

विधानसभा अध्यक्षाची निवड विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच होईल, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असं देखील थोरात म्हणाले. नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची जागा रिकामीच होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, आता बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षाची निवड पावसाळी अधिवेशनातच होणार असल्याची माहिती दिली. तसंच, याआधी काँग्रेसचाच अध्यक्ष असल्याने पुन्हा एकदा काँग्रेसचाच अध्यक्ष असेल, असं देखील थोरात म्हणाले.

- Advertisement -

पवार-ठाकरे भेट विशेष बाब नाही

बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. शरद पवार हे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत. मला वाटतं त्यांना पक्षाचं बंधन आघाडीमध्ये नाही आहे. सर्वांना ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतची भेट आमच्यासाठी विशेष बाब नाही. शेवटी आघाडीसाठी आणि राज्यातील जनतेसाठी मदत होणारी चर्चा असते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

सरकार भक्कमच आहे

महामंडळाच्या वाटपाची चर्चासुरु आहे. जर महामंडळ वाटप झालं तर हे सरकार अजून भक्कम होईल अशी चर्चा सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना सरकार भक्कमच आहे, असं थोरात म्हणाले. दोन वर्ष होत आली आम्हाला…आणखी तीनही होतील आणि पुढेही होईल, काही अडचण वाटत नाही आम्हाला, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -