घरCORONA UPDATEखासगी हॉस्पिटलवर पालिकेचे ऑडिटर

खासगी हॉस्पिटलवर पालिकेचे ऑडिटर

Subscribe

खासगी रूग्णालये रूग्णांकडून अव्वाचे सव्वा बील आकारत असल्यामुळे राज्यसरकारने ५ सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी खासगी रूग्णांलयाच्या बीलांवर वॉच ठेवण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलवर दोन ऑडिटर नेमले आहेत.

मागील तीन महिन्यात मुंबईत कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक झालेले रूग्ण आणि सुमारे पंधराशेहून मृत्यूमुखी पडलेले मुंबईकर यामुळे महापालिकेच्या सोयीसुविधा आणि अंमलबजावणीबाबत सर्वत्र टीका होत होती. अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी खासगी रूग्णालयांना चाप लावण्यासाठी पाच सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला. यावर एक पाऊल पुढे जात मुंबईचे महापालिका आयुक्ता इक्बाल चहल यांनी प्रत्येक खासगी रूग्णालयावर सनदी अधिकाऱ्यांसोबत पालिकेचे दोन ऑडिटर नेमले आहेत. यामुळे आता राज्यसरकारने आणि मुंबई महापालिकेने नियमित केलेल दर आणि पीपीई किटच्या किंमतीच्या वर जर कोणी रूग्णांकडून जास्त दर आकारले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या रूग्णाच्या नातेवाईकांना आपले बिल राज्यसरकार आणि मुंबई महापालिकेने निश्चत केलेल्या दरापेक्षा जर कोणी जास्त आकारणी करत असेल तर पालिकेच्या ऑडिटरशी तात्काळ संपर्क साधा असे आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपलं महानगरशी बोलताना केले.

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तिन रुग्णालयांसाठी स्वतंत्र सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर आता आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करून यासर्वांवर खासगी रुग्णांलयांचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येकी महापालिकेचे लेखापरिक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेसह खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांचे योग्यप्रकारे वापर रुग्णांसाठी होता किंवा कसे यावर नियंत्रण ठेवताना या रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटही थांबण्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे खाटांअभावी होणाऱ्या रुग्णांचे हाल आता कमी होवून त्यांना खासगी रुग्णालयातही योग्य दरात उपचार प्राप्त होणार आहेत.

- Advertisement -

मुंबईतील  ‘कोविड कोरोना १९’ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयन महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी संबंधित रुग्णालयाद्वारे केली जात आहे. मात्र, खाजगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य समन्वय साधण्यासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी तीन सनदी अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत बोलतांना, हा मोठा बदल असून कोरोनाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे विकेंद्रीकरण करून विभाग स्तरावरच वॉर रुम तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे १९१६ वर भार हलका होईल आणि नागरिकांना विभागस्तरावरच रुग्णालयातील खाटांचा प्रश्न असो वा रुग्णवाहिकेचा प्रश्न असो तो सुटला जाईल. खासगी रुग्णालयांमधी ८० टक्के खाटा ताब्यात आल्या आहेत. पण त्यांचा प्रत्येक रुग्णांना योग्यप्रकारे करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांना समन्वयक म्हणून नेतानाच प्रत्येकी दोन ऑडीटरही नेमले आहेत,असे स्पष्ट केले.


हे ही वाचा – आकडे लपवण्याच्या नादात धारावीत टेस्ट केल्या नाहीत – प्रवीण दरेकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -