घरमहाराष्ट्रगांजा नाही दिला म्हणून केलं ठार

गांजा नाही दिला म्हणून केलं ठार

Subscribe

गांजाच्या पुडीला नकार दिल्यानंतर पटेल आणि तीघांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. या शाब्दिक बाचाबाचीचे हाणामारीत रुपांतर झाले. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेला अमिन मदतीसाठी ओरडत होता.

मुंबईतील कॉटनग्रीन येथे एका तरुणाला गांजा दिला नाही म्हणून मारहाण करत ठार केले. कॉटनग्रीन स्थानकाच्या स्कायवॉकवर मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. अमिन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. केवळ गांजाची पुडी दिली नाही म्हणून तीघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी बांबुने जोरदार प्रहार करत त्याला ठार केले.

नागपाड्यातील पालिका वसाहतीत राहणारा बंटी कांबळे त्याचा मित्र अमिन पटेल याच्यासोबत कॉटनग्रीन येथील स्कायवॉकजवळ बसले होते. त्यावेळी तीन जणांची टोळी अमिन पटेलकडे गांजाची पुडी मागितली. तेव्हा अमिन पटेल याने माझ्याजवळ नाही असे त्यांना सांगितले. गांजाच्या पुडीला नकार दिल्यानंतर पटेल आणि तीघांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. या शाब्दिक बाचाबाचीचे हाणामारीत रुपांतर झाले. त्या तीघांनी अमिन पटेलला लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्याला लाकडी बांबुने मारायला सुरुवात केली. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेला अमिन मदतीसाठी ओरडत होता.

- Advertisement -

हेही वाचा – मेट्रो, विमानतळ गैरकारभार: कॅगचे सिडकोवर ताशेरे; तत्कालीन भाजपच्या सरकारवर प्रश्नचिन्ह?


दरम्यान, मारहाणीत अमिन निपचित पडलेला पाहून तीनही आरोपी भयभीत होत तिथुन त्यांनी पलायन केले. अमिन पटेलचा मित्र बंटी कांबळे याने तत्काळ काळाचौकी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भांदवी कलम ३४, ३०२, ३९७ आणि ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -