घरमहाराष्ट्रराज्यात चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यात चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

राज्यातील चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची पुणे महापालिकेत बदली झाली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदल्यांच्या मुद्याबाबत आज सकाळीच ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

मुंबईतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. आता ए. शैला यांना हाफकिन इन्स्टिट्यूटच्या एमडीपदाची धुरा देण्यात आली आहे.

- Advertisement -

सुरुवातीला हाफकिनचे एमडी म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली होती. खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. मात्र, आता खेमनार यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

व्ही. बी. पाटील यांची अन्न व नागरी पुरवठा विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर पुण्यातील भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदावर वर्णी लागली आहे.

- Advertisement -

दहाच दिवसांपूर्वी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकार्‍यांची बदली झाली होती. तर अवघ्या तीन दिवसांपूर्वी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांची टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या बदल्यावरून गुरुवारी सकाळीच ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव – ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री – कोणी एक दोन नाहीत, तर अनेक. या मंत्रालयाचे ‘बजेट’ नाही. ‘टार्गेट’ असते अशी टीका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -