घरमहाराष्ट्रपुणे - नगर महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

पुणे – नगर महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

Subscribe

पुणे - नगरच्या महामार्गावर झाड कोसळल्याने मोटी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून या प्रवाशांच्या पाण्याची आणि नाश्ताची सोय राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून करण्यात आली होती.

कोकणासह पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि घशाला सतत पडणारी कोरड यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला. नगरच्या देखील काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यापासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, पावसाने थोडासा का होईना गारवा दिला. मात्र, या पावसामुळे पुणे नगरच्या महामार्गावर मोठे झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एका मागोमाग एक अशा पाच किलोमीटरपर्यंत एसट्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी नाश्ता आणि पाण्याची सोय केली होती.

- Advertisement -

दुष्काळ चारा छावण्यांची पाहणी

परिवहन मंत्री दिवाकर रावते हे रविवारी नगर जिल्ह्यात दुष्काळ चारा छावण्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान परत येत असताना. पाऊस आणि वादळामुळे पुणे नगर महामार्गावर एक झाड कोसळले होते. त्यामुळे या महामार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये स्वत: परिवहन मंत्र्यांच्या गाड्याच्या ताफा सुद्धा शिक्रापुर गावा जवळ अडकून पडला होता. एका मागोमाग एक अशा सर्व गाड्यांची पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडी दरम्यान, अडकलेल्या प्रवाशांना परिवहन मत्र्यांनकडून नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली होती.


हेही वाचा – एसटी महामंडळाने दिली मुस्लिम कर्मचाऱ्यांना ‘ईदी’

- Advertisement -

हेही वाचा – खासगी बसेसनी अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास परवाना रद्द – दिवाकर रावते


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -