घरमहाराष्ट्रपुणे : लिंगाणा किल्ल्यावरुन तोल गेल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू

पुणे : लिंगाणा किल्ल्यावरुन तोल गेल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू

Subscribe

पुण्यातील वेल्हे तालुक्यातील लिंगाणा किल्ल्यावरुन पाय घसरुन गिर्यारोहक दीपक रोकडे (३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुण्यातील वेल्हे तालुक्यातील लिंगाणा किल्ल्यावरुन खाली उतरताना एका गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. किल्ल्यावरुन खाली उतरताना बोराट्याच्या नाळीत तोल जाऊन पडल्याने गिर्यारोहक दीपक प्रल्हाद रोकडे (३६) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रोकडे यांच्या पश्चात पत्नी, वडील, चार बहिणी असा परिवार आहे.

पुण्यातील एका संस्थेतर्फे रोकडे लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातून ५० जणांचा ग्रुप वेल्हे तालुक्यातील मोहरी येथे आला होता. त्या ठिकाणी प्रत्येकांनी तीन तासाची विश्रांती घेतली आणि पहाटेच्या सुमारास ट्रेकिंगकरता निघाले. प्रत्येक जणांनी गडाच्या दिशेने चढायला सुरुवात केली. त्यादरम्यान बोराट्याच्या नाळी मार्गावर खडकाळ भाग होता. या भागातून चालताना रोकडे यांचा खडकावरुन पाय घसरला आणि ते दहा – पंधरा फूट खोल पडले. त्यांनी सेफ्टीकरता हेल्मेट देखील घातले होते. मात्र ते ज्यावेळी त्यांचा तोल गेला त्यावेळी हेल्मेट एका बाजूला गेल्याने त्यांच डोक दगडावर आपटले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रोकडे पडल्याचे कळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रोकडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस हवालदार आशा गवारी पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – बिकिनी घालून ट्रेकिंग करणाऱ्या ‘गिगू’चा थंडीमुळे मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -