घरदेश-विदेशबिकिनी घालून ट्रेकिंग करणाऱ्या 'गिगू'चा थंडीमुळे मृत्यू

बिकिनी घालून ट्रेकिंग करणाऱ्या ‘गिगू’चा थंडीमुळे मृत्यू

Subscribe

बिकीनी घालून पर्वत सर करणाऱ्या गिगू या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अनेकांना ट्रेकिंग करण्याचे वेड असते. पावसात आणि थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बरेच जण ट्रेकिंग करण्यसाठी जात असतात. अशीच एक महिला बिकीनी घालून उंच पर्वत सर करण्यासाठी गेली होती. या महिलेचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गिगू वू (३६) असे तिचे नाव असून सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन्स आहेत. ती पर्वत चढतानाचे ग्लॅमरर्स फोटो ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अपलोड देखील करायची. तर बिकीनी हायकर म्हणून लोक ओळखत होते.

६५ फूट खोल दरीत कोसळून गिगूचा मृत्यू

ईवान येथील युशान या बर्फाळ पर्वातावर ती ट्रेक करण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान, तिचा युशान या बर्फाळ पर्वतावरुन ६५ फूट खोल दरीत कोसळल्याने गिगू हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या आधी गिगू हिने सॅटेलाईट फोनवरुन मित्राला फोन केला होता. तिने फोनवरुन मित्राला सांगितले की, ‘मी दरीत अडकली असून, मी जखमी देखील झाली आहे. मला या ठिकाणाहून हलता देखील येत नाही.’ हे कळताच गिगूच्या मित्राने आपत्कालीन विभागाला फोन करुन गिगूला मदतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर आपत्कालीन विभागाचे तातडीने युशान पर्वतावर हेलिकॉप्टर पाठवले. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गिगूपर्यंत पोहचू शकले नाही.

- Advertisement -

२८ तासानंतर सापडला मृतदेह

आप्तकालीन विभागाने तातडीने युशान पर्वतावर हेलिकॉप्टर पाठवून गिगूचा शोध घेण्यात आला. त्यानंतर तब्बल २८ तासानंतर बचाव पथकाला गिगूचा मृतदेह दरीत सापडला. एक आठवड्यापूर्वीच गिगू या पर्वतावर फोटो काढण्यास आली होती. ती पर्वतावरील सर्वात उंचावर चढण्याचा प्रयत्न करत होती. त्या दरम्यान गिगू या महिलेचा मृत्यू झाला आहे.


पहा – Video : ट्रेकिंग करताना जेएनयूच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -