घरमहाराष्ट्रजिल्ह्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा

Subscribe

जागतिक आदिवासी दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग शहरात आदिवासींनी शुक्रवारी मिरवणूक काढली होती. पारंपरिक वेश परिधान केलेले महिला, पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन तसेच काठ्यांवर चालून रॅलीत भाग घेतला होता. पारंपरिक वेशामधील आदिवासी बांधव नृत्य करत होते. महिला वर्ग डोक्यात रान फुले घालून गाणी म्हणत संगीतावर ठेका धरून नाचत होत्या. या मिरवणुकीतील मोठा धनुष्यबाण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -