घरमुंबईशहापुरात गढूळ पाणीपुुरवठा

शहापुरात गढूळ पाणीपुुरवठा

Subscribe

नागरिकांच्या आरोग्याला धोका

शहापूर नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना माती, केर कचरा असलेल्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. हे गढूळ पाणी पिण्यासाठी वापरता येत नसल्याने ऐन पावसाळ्यात रहिवाशांच्या घशाला कोरड पडली आहे.

मागीलदोन वर्षांपूर्वी शहापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यानंतर ही नगरपंचायत नागरी सुविधा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा नागरिकांचा आरोप आहे. भातसा नदीपात्रातील पाण्याचे शुद्धीकरण न करता हे दूषित मातीमिश्रित गढूळ पाणी टाकीत साठवून ते थेट नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे.

- Advertisement -

10तत्कालीन शहापूर ग्रामपंचायतीने बसविलेला जलशुद्धीकरण प्लांट 35 वर्षांपुर्वीचा जुना असल्याने तो कालबाह्य असून नादुरुस्त होऊन बंद पडला आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प नगरपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अशी माहिती शहापूर नगरपंचायतीचे नगरसेेवक विनोद भोईर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -