घरमहाराष्ट्रTruck Drivers Protest : पुढील 10 दिवस ST ला पुरेल एवढा इंधनसाठा...

Truck Drivers Protest : पुढील 10 दिवस ST ला पुरेल एवढा इंधनसाठा ‘या’ आगारामध्ये उपलब्ध

Subscribe

सध्या राज्यातील सर्व एसटी आगारात किमान दोन दिवस पुरेल एवढचा इंधन साठा उपलब्ध आहे. ट्रक-टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला, तर एसटीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे नववर्षा निमित्ताने देवदर्शनाला गेलेल्या सर्वसामान्य नागिरकांना परतताना त्रास सहन करावा लागेल.

नांदेड : नवीन वाहक कायद्यातील हिट अँड रनच्या शिक्षेविरोधात ट्रक-टँकर चालक संपावर गेले आहेत. यामुळे वाहनधारकांना इंधनाचा तुटवडा होण्याची भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी इंधना भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. याचा फटका एसटी वाहतुकीला बसण्याची शक्यता वर्तवली आहे. पण एसटीला 10 दिवस पूरेल एवढा इंधनसाठा नांदेडमध्ये आहे. यामुळे नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यावर पुढील 10 दिवस एसटी वाहतूक सुरळीत धावू शकते. असे आगार प्रमुखानी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

ट्रक-टँकर चालकाच्या संपामुळे एसटी बससेला लागणारे डिझेल हे ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नाही. यासाठी एसटीच्या विविध डेपोमध्ये डिझेल आणण्यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे. विदर्भात एसटी बसेससाठी रोज दोन लाख लिटर डिझेल लागते. त्यासाठी विदर्भात सध्या सर्व एसटी डेपोमध्ये साडे सहा लाख लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे एसटी तीन दिवस सुरळीत धावू शकेल, अशी माहिती गभने दिली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील एक दिवस पुरेल एवढेच डिझेल साठा असल्याने नागपूरातील दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटीसाठी तिथून डिझेल भरून येण्याची सूचना आहेत, असेही गभने दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pune Crime : ‘तिची’ थर्टी फर्स्टची झिंग उतरलीच नाही; सोसायटीचं गेट बंद करून तरुणीचा राडा

राज्यात दोन दिवस पुरेल एवढाच इंधन साठा

सध्या राज्यातील सर्व एसटी आगारात किमान दोन दिवस पुरेल एवढचा इंधन साठा उपलब्ध आहे. ट्रक-टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला, तर एसटीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे नववर्षा निमित्ताने देवदर्शनाला गेलेल्या सर्वसामान्य नागिरकांना परतताना त्रास सहन करावा लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut: दक्षिणेकडून काय, ते दक्षिण ध्रुवावरूनही प्रचार करतील; राऊतांचा पंतप्रधानांना टोला

एसटीची अशी आहे स्थिती

  • एसटीच्या दररोज सरासरी 15 हजार बसेस धावणार आहेत.
  • बसेससाठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते.
  • भारत पेट्रोलियम(BPCL) आणि इंडियन ऑइल कार्पोरेशन (IOC) या दोन पेट्रोल केमिकल कंपन्यांच्या कडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते.
  • एसटीच्या 250 डेपोमध्ये डिझेल भरण्याची सोय आहे.
  • एसटीच्या सर्व आगारात आजचा दिवस पुरेल इतकाच डिझेलचा साठा उपलब्ध आहे.
  • ट्रक-टँकर चालक संप आणखी काही दिवस चालल्यास डिझेलची कमतरता भासून लागल्यानंतर बसच्या फेऱ्या देखील रद्द होऊ शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -