घरक्राइमPune Crime : 'तिची' थर्टी फर्स्टची झिंग उतरलीच नाही; सोसायटीचं गेट बंद...

Pune Crime : ‘तिची’ थर्टी फर्स्टची झिंग उतरलीच नाही; सोसायटीचं गेट बंद करून तरुणीचा राडा

Subscribe

मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेकजण 31 डिसेंबरच्या रात्री पार्टींचे आयोजन करतात. यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असतो. अशातच मागील काही दिवसांपासून थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये तरुणींचीही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे : ससंस्कृत असलेल्या पुण्याला आता नेमकं काय झालंय हे कळायला मार्ग उरला नाही. कारण, पुण्यातून दरदिवसाला धक्कादायक अशा घटना समोर येत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना पुण्यात 31 डिसेंबर रोजी घडली असून, थर्टी फर्स्टला दारूच्या नशेत तर्राट असलेल्या एका तरुणीने सोसायटीचे गेट बंद करून राडा घातला. यामुळे वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत खळबळ उडाली होती. (Pune Crime The zing of her thirty first has not come off The young womens cry after closing the gate of the society)

मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अनेकजण 31 डिसेंबरच्या रात्री पार्टींचे आयोजन करतात. यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असतो. अशातच मागील काही दिवसांपासून थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये तरुणींचीही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत एका तरुणीने दारूच्या नशेत परिसरात गोंधळ घातला. यामुळे या परिसरात काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावले. त्या तरुणीना समाजवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र, घटनास्थळी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्या तरुणीने लोटपोट केली. नशेत तर्राट असलेली तरुणी एवढ्यावरच न थांबता तिने सोसायटी परिसरात असलेल्या साहित्याचीही तोडफोड केली.

- Advertisement -

हेही वाचा : Awhad On Ajit Pawar : आव्हाडांचा अजित पवारांवर थेट हल्ला; म्हणाले- ‘धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा’

ती तर पोलीस अधिकाऱ्याची मुलगी

31 डिसेंबरच्या रात्री वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत तरुणीने घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी शेवटी बळाचा वापर करत त्या तरुणीला ताब्यात घेतलं. त्या तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता ती तरुणी एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिला लगेचच सोडून देण्यात आलं, अशीही माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : कॉल केल्यानंतर युझरचे नाव आणि नंबर नाही दिसणार; Truecaller बंद होणार? वाचा सविस्तर

तरुणीचा राडा सीसीटीव्हीत कैद

31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीचा राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नशेत असलेली तरुणी सोसायटीतील नागरिकांना कसा त्रास देतेय हे सर्व दिसत असून, अशा तरुणीला ताब्यात घेऊन तिला लगेच सोडल्याचेही दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -