घरमहाराष्ट्रचिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

Subscribe

चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिंचवडच्या दळवीनगर येथे आज पहाटे ही घटना घडली आहे.

चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिंचवडच्या दळवीनगर येथे आज, गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. यामध्ये प्रदीप मोटे आणि शंकर क्षिरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत पाच घरं जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी चिंचवड पोलीस करत असून अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.

चार सिलेंडर बाहेर काढल्याने दुर्घटना टळली

अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास दळवीनगर झोपडपट्टी चिंचवड येथे आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला तर चार सिलिंडर घरामधून बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाने एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच आसपासच्या पाच घरांना देखील मोठ्या प्रमाणात आग लागली आणि ती घरं जळून खाक झाली.

- Advertisement -

एकत्र कुटुंबातील दोघांचा मृत्यू

अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी यात तर्कवितर्क काढण्यात येत आहेत. घटना घडली तेव्हा शंकर क्षीरसागर यांच्या घरात आई, बहीण, दाजी, भाचा हे एकत्र घरात होते. मात्र अचानक आग लागल्याने सर्व जण घरातून बाहेर पडले. परंतू शंकर आणि प्रदीप मोटे यांना बाहेर पडता आले नाही. या भीषण आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक नगरसेवक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यांनी अवघ्या एक तासात आग आटोक्यात आणली. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -