घरताज्या घडामोडीसहकार क्षेत्रातील आवश्यक कामे मविआ सरकार करणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सहकार क्षेत्रातील आवश्यक कामे मविआ सरकार करणारच, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe

काळानुसार या क्षेत्रामध्ये बदल घडत असतील तर आपल्याला बदल घडवला पाहिजे.

देशाला महाराष्ट्राने सहकाराची दिशा दाखवली आहे. या सहकार क्षेत्रात अनेक अडचणी आल्या आहेत. परंतु तसे पाहिले तर प्रत्येक क्षेत्रात अडचणी येत असतात. आपल्यासारखे सहकारी सोबत असल्यानंतर मला नाही वाटत हे करणं अवघड काम आहे म्हणून सरकार म्हणून जे जे काम करायचे आहे ते केल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार राहणार नाही असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विधानभवानात गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील आठवणी सांगितल्या आहेत. सहकार क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी किती परिषदा घ्याव्या लागल्या तरी मी तयार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित ‘शताब्दी एका विचाराची, कर्तृत्वाची’ या कार्यक्रमात बोलत होते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की,महाराष्ट्र म्हटलं म्हणजे जिद्द आली, ताकद आली, लढवय्येपण आलं, शौर्य आलं असे सगळं आले. कारण मला जास्त सहकार्य क्षेत्राची कल्पना नाही आहे. परंतु सहकार्य क्षेत्राला मार्ग दाखवणारा हा महाराष्ट्र आहे. असे लेचेपेचे नाही आहे की, कोणाच्या मनात आलं म्हणून बँकांची वाट लावली, महाराष्ट्राची वाट लावली एवढे नाही हे, पण ह्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा मुळ आहे. वरचे शेंडे कापले म्हणजे ते मुळासकट उघडे नाही पडत असे हे तळागाळापर्यंत रुजलेले क्षेत्र आहे.

- Advertisement -

या क्षेत्राला थोडसं खतपाणी, थोडसं पाणी घालणे हे सरकारचे काम आहे. त्याच्या समृद्धीसाठी मदत करणे हे सरकारचे काम आहे. मग त्या क्षेत्रामध्ये कोणाची लोकं आहेत हा भाग आला, पण राज्याची समृद्धी आणि या समृद्धीचा घटक सहकार क्षेत्र आहे. म्हटल्यानंतर त्या क्षेत्राची जपणूक नाही तर त्यात सुधारणा कशी करता येईल हे करण्याचे कर्तव्य सरकारचे आहे. आपल्यासारखे सहकारी सोबत असल्यानंतर मला नाही वाटत हे करणं अवघड काम आहे म्हणून सरकार म्हणून जे जे काम करायचे आहे ते केल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार राहणार नाही. असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

अनेक जण उच्च शिक्षण घेतललेले आहेत. इंग्रजीवर प्रभुत्व आहे. अशातला भाग नाही परंतु पण माझी जी बुद्धी आहे. एखाद्या महाविद्यालयात जायचं आणि शिकायचं, गुलाबराव ज्या शिक्षण संस्थेत शिकले त्याची निर्मिती शाहू महाराज यांनी सुरु केली आहे. पण नुसते प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडलं हे गरजेचे नाही. ज्या संस्थेत शिकलो त्याचा वारसा आणि वसा घेऊन पुढे कस जाईल. तसे गुलाबराव गेले म्हणून मला असं वाटत आहे की, सहकार क्षेत्र उभे राहिले. नाहीतर सहकार क्षेत्र तुम्ही म्हणत आहेत की ह्या अडचणी आहेत..त्या अडचणी आहेत.

- Advertisement -

सर्व क्षेत्रात अडचणी

असे कोणतेही क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सहकार क्षेत्र आणलं होते. त्या सर्वसामान्य माणसाला जर आपण बांधिल आहोत तर आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी कितीही परिषदा घ्याव्या लागल्या तर घ्या माझी तयारी आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सहकार क्षेत्रात बदल घडवावे लागतील

सहकार क्षेत्र मोडून टाकावे अशी कोणाची धारणा असणार नाही. मग त्यात बँक असतील साखर कारखाने असतील, का अडचणी येत आहेत. काळानुसार या क्षेत्रामध्ये बदल घडत असतील तर आपल्याला बदल घडवला पाहिजे. जर गुलाबरावांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सहकार क्षेत्र तयार केलं असेल तर त्या क्षेत्रात बदल घडवावे लागतील. बदल घडवण्याची हिंमत आपल्या मनगटात असली पाहिजे, त्यांनी दाखवलेल्या दिशेवर चालण्याची हिम्मत आपल्या महाराष्ट्रात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : केंद्राने केंद्राच्या प्रमाणे काम करावं राज्यांच्या अधिकारांवर…, अजित पवारांचे सूचक वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -