घरमहाराष्ट्रCM- मी ट्रम्प नाही, डोळ्यासमोर आपल्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही

CM- मी ट्रम्प नाही, डोळ्यासमोर आपल्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही

Subscribe

उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत येत्या २५ आणि २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भावनिक उद्गार राज्यातील जनतेसंदर्भात काढले आहेत. “मी ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही,” असं भावनिक उद्गार काढले आहेत. संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे उत्तरं दिली असल्याचं दिसत आहे. याच मुलाखतीत उद्धव ठाकरे आपण डोनाल्ड ट्रम्प नसल्याचं सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत येत्या २५ आणि २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटं आदी प्रश्न विचारले आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? तसंच मंत्रालयात कमी गेल्याचा होणार आरोप याबाबतही विचारलं आहे.

- Advertisement -

संजय राऊतांच्या प्रश्नांची उद्धव ठाकरेंनी बेधडकपणे उत्तरं दिल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, कोरोनासोबत राहायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. शहाणं व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपण झालं पाहिजे असं म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिले सहा महिने आव्हानं घेऊन आले होते. कोरोनाचं संकट कधी संपणार हेच आपल्याला माहिती नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी यावेळी अंतिम परीक्षांसंबंधी सविस्तर भूमिका मांडली असून मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच ते नेमकं काय बोलले आहेत याचा उलगडा होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सामनाला पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.


हेही वाचा – Oxford Vaccine: सिरमने गुंतवले तीस मिनिटात २० कोटी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -