घरCORONA UPDATEमुंबईकरांनो सावधान, कोरोनामृतांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक!

मुंबईकरांनो सावधान, कोरोनामृतांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक!

Subscribe

दररोज कोरनाच्या मृत्यूबाबतची नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरही आता हैराण झाले आहेत. मुंबईत एकूण ५ हजार ८१४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ६० ते ७० वयोगटातील १ हजार ७०८ मृतांचा समावेश आहे. याचाच अर्थ मुंबईतील मृतांपैकी एक चतुर्थांश म्हणजेच २९.३७ टक्के मृत्यू हे ६० ते ७० वयोगटातील आहेत.

सध्या कोरोनाबाधितामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आहे. मुंबईत आतापर्यंत ५ हजार ८१४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात ५० ते ६० वयोगटातील १ हजार ५५४ मृतांचा समावेश आहे. मुंबईतील ५० ते ६० वयोगटातील मृत्यंच प्रमाण २६. ७२ टक्के आहे. त्याचप्रमाणे १० वर्षाखालील १० मुलांचा आणि १०० ते ११० वर्षादरम्यानच्या एका व्यक्तीचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

इम्युनिटी पॉवर कमी

मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे दगावणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. कारण अनेकांमध्ये इम्युनिटी पॉवर कमी असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा आणि अन्य आजार असल्याने त्यांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोना लागणाची होण्याचं प्रमाण अधिक आहे. मुंबईत ६० ते ७० वयोगटातील कोरोना रुग्णांमध्ये ६२ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांचा समावेश आहे. तर ५० ते ६० वयोगटातील बाधितांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. ४० ते ५० वयोगटातील बाधितांमध्ये ६७ टक्के पुरुष ३३ टक्के महिला, ३० ते ४० टक्के वयोगटामध्ये ६५ टक्के पुरूष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सरकारने घेतला निर्णय, आता ३१ डिसेंबरपर्यंत करा Work From Home!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -