घरमहाराष्ट्रयुतीबाबत आमचं ठरलंय - उद्धव ठाकरे

युतीबाबत आमचं ठरलंय – उद्धव ठाकरे

Subscribe

लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरच्या दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब कोल्हापुरात दाखल झाले असून लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर ठाकरे कोल्हापुरच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांनी अंबाबाईचं दर्शन घेतले.

अंबाबाईच्या दर्शनानंतर समस्त कोल्हापुरकरांचे आभार मानत ठाकरेंनी मानाचा मुजरा देखील केला. आमची युती मजबूत असून युतीतील जागा वाटपांबाबत आमचे ठरलं आहे, असे कोल्हापुरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या नियोजित दौऱ्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंसह महसूल मंत्री चंद्रकात पाटील हे देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -