घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ‘महाआघाडी’चे सरकार आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली असून त्यांनी शिवरायांना वंदन करुन आपल्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्यासोबत यावेळी आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. तसेच पोलिसांनी देखील याठिकाणी कडेकोट बंदोबस्त केला होता. तर नव्ठाया मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे. आज फक्त शुभेच्छा देऊयात, कोणतंही इतर भाष्य नको. – आदित्य ठाकरे; आमदार

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँगे्रेसचे विधीमंडळ नेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते नितिन राऊत यांचा सामावेश होता.


हेही वाचा – संजय राऊत म्हणतात, ‘आता गोव्यात भूकंप’; शिवसेनेचं मिशन गोवा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -