घरमुंबईमोबाइलचा आयएमईआय नंबर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मोबाइलचा आयएमईआय नंबर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Subscribe

माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी मोबाइलचा आयएमईआय नंबर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

दिवसेंदिवस मुंबईत मोबइल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. चोरीचे मोबाइल सापडला जाऊ नये म्हणून चोरट्यांकडून मोबाइलचा आयएमईआय नंबर बदलण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. चोरीच्या मोबाइलचा आयएमईआय नंबर फक्त शंभर ते दोनशे रुपयांत बदलून देत होते. या टोळीचा देखील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार या टोळीने हजारो मोबाइलचे आयएमईआय बदलले आहेत. नुकतचं दक्षिण मुंबईतील सहरा मार्केटमधून सहा जणांचा पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल चोराट्यांनी पोलिसांना हैराण केलं होत. चोर फारच हुशार होते. चोरीच्या दाखल केलेल्या गुन्ह्यांतील ९० टक्के मोबाइल सापडतचं नव्हते. हे सर्व चोरलेले मोबइलचे आयएमईआय नंबर बदलले जातात किंवा देशाबाहेर नेले जातात. मुंबईतील सहारा मार्केटमध्ये आयएमईआय नंबर बदलून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळावली.

- Advertisement -

माहितीच्या आधारे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी बनावट ग्राहकाला दोन मोबइल घेऊन या ठिकाणी पाठविले. या बनावट ग्राहकांकडून त्या टोळीने दोन मोबाइलचे आयएमईआय नंबर बदलण्यासाठी पाचशे रुपये मागितले. त्याच दरम्यान त्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. मोबाइलचा आयएमईआय नंबर बदल करणाऱ्या लालाराम चौधरीला अटक केली. याला अटक केल्यामुळे आणखी साथीदारांना अटक करण्यास पोलिसांना यश आले. प्रवीण संघवी, सूरज खारवार, नौशाद अस्लम शेख, इम्तियाझ अन्सारी, सर्फराज सय्यद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू, एक हजार मोबइलसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


हेही वाचा – मांजरीने खाल्ले मानवी भ्रूण; केईएम हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -