घरमहाराष्ट्रकेंद्र सरकारनं मदत केली तर शेतकऱ्यांना सावरण्यात मोठी मदत होईल - वडेट्टीवार

केंद्र सरकारनं मदत केली तर शेतकऱ्यांना सावरण्यात मोठी मदत होईल – वडेट्टीवार

Subscribe

मराठावाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेली. यामुळे शेतकरी अक्षरश: मोडून पडला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारने मदत केली तर शेतकऱ्यांना सावरण्यात मोठी मदत होईल, असं म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मदत करु, असं वडेट्टीवार म्हणाले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेणार

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी ओला दुष्काळासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा का याबाबत विचार सुरु आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -