घरमहाराष्ट्रPothole Scam : कंत्राटदारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम, मुंबईच्या खड्ड्यांवरून शेलारांचा...

Pothole Scam : कंत्राटदारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम, मुंबईच्या खड्ड्यांवरून शेलारांचा हल्लाबोल

Subscribe

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून शिवेसना-भाजपा पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील रस्त्त्यांवरील खड्ड्य़ांवरून मुंबई महानगरपालिकेवर आणि सत्तारुढ शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. कंत्राटदारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम असल्याचे म्हणत शेलारांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून शिवसेनेवर टीका केली आहे.

“पालिकेचे स्वत:चे ट्रॅकिंग ९००, लोकांच्या तक्रारी ९२७, आणि महापौर म्हणतायत आम्ही ४२ हजार खड्डे बुजवले. थोडी तरी शरम बाळगा.” अशी टीका करत  “कंत्राटदाराला खड्डे बुजवण्याचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कंत्राटदाराच्या समर्थनार्थ आकडे किंवा त्याच्या समर्थनार्थ भूमिका शिवसेना का घेतय? मुख्यमंत्री म्हणतायतं कंत्राटदारांवर कारवाई करा. खड्डे बुजवण्याच्या कंत्राटदारावर एकावर तरी या वर्षभरात मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली का? नाही. असं म्हणत शेलारांनी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घाला” अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

“लोकं खड्ड्यांभोवती झाडं लावयची आत्ता रंगोळी काढतायतं. आज सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये एका युवकाने खड्डेरुपी कोरोनाची जी रंगोळी काढली आहे, त्यावर शिवसेनेकडून हल्ल्ला होईल अशी मला भीती आहे. याच कारण म्हणजे ज्य़ा रेडिओ जॅकीने खड्ड्यांवर गाणं केलं तिची तुडवातुडवी केली. आत्ता आमच्या मुंबईकर युवकाने खड्ड्यांची दाहका दाखवण्यासाठी खड्ड्याभोवती जी कोरोनारुपी रांगोळी काढली आहे,  त्या युवकांवर हल्ला केलात तर खबरदार…. त्यामुळे कंत्रादारांच्या समर्थनाचे धंदे हाच शिवसेनेचा कार्यक्रम झालेला आहे.” असा टोला शेलारांनी लगावला आहे.

‘महापौरांचा प्रवास म्हणजे पळता भुई थोडी’

“महापौरांचा प्रवास म्हणजे त्यांची धावपळ नाही, पळता भुई थोडी झालेली आहे. धावपळ केव्हा समजली असती, प्रवास केव्हा समजला असता…. गणपतीपूर्वी पावसाळ्याच्या काळात महापौरांनी त्या खड्ड्यांची पाहणी केली असती तर. तर त्यांना मुंबईकरांची चिंता आहे असं झालं असतं. मुंबईकरांना भावना दिसतायत. निवडणूका समोर आहेत म्हणून कंत्राटदाराला बील काढण्यासाठी एवढे खड्डे बुजवले आम्ही हे खोटे खड्ड्यांचे आकडे, खोटे खड्डे बुजवल्याचे प्रकार हा दाखवून कंत्राटदाराला मलिदा मिळवण्याचा कार्यक्रम आहे. अशी टीका शेलारांनी केली आहे.

- Advertisement -

‘सुप्रिया सुळेंचा ‘सेफ्ली विथ खड्ड्यां’चा कार्यक्रम कुठल्या बासणात गेला?’

“मुख्यमंत्र्यांनी फेकलेलं वाक्य भाषणातील वाक्यासारखं आहे. राज्यभरातील विविध एन्जसीच्या अंतर्गत येणारे जे खड्डे आहेत, रस्ते आहेत त्या सर्व एन्जसीची बैठक घेतली असती तर आम्हाला पटलं असतं. मात्र पुढे जाऊन त्यांच्यावरही कारवाई केली असती तर विश्वास पटला असता. खड्डे बुजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालाची चौकशी जरी करायला लावली असती तरी त्यांच्या हेतूवरही आम्ही शंका घेतली नसती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वाक्य सुप्रिया सुळे यांनी गेल्यावेळी केलेल्या खड्डे विथ सेल्फीच्या आंदोनलनासारखेचं आहे. दिखावूपणाचे आहे, दाखावूपणाने जनतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत. आत्ता सुप्रिया सुळे कुठे गेल्या? सेल्फी विथ खड्ड्यांच्या कार्यक्रम कुठल्या बासणात गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी विनंती शेलारांनी केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -