घरताज्या घडामोडीविजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर; पदभार स्वीकारला!

विजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर; पदभार स्वीकारला!

Subscribe

आवडीचं खातं न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नारज असलेले काँग्रेसचे आमदार आणि महाविकासआघाडीतील एक कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी आता दूर झाली असून त्यांनी आज मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार देखील स्वीकारला आहे.

महाविकासआघाडीतील नाराजांची मनधरणी करताना तिनही पक्षांच्या नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, सुनील राऊत, खुद्द अजित पवार, प्रकाश सोळंके अशी बरीच मोठी नाराजांची यादी झाली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार. वडेट्टीवारांना मंत्रिपद मिळूनही आवडीचं खातं न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित राहून आणि परवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनालाही अनुपस्थित राहून वडेट्टीवारांनी ती नाराजी जाहीर देखील केली होती. मात्र, आता त्यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी आजच आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘आमचं खातं शिवसेनेकडे दाखवलं गेल्यामुळे नाराजी होती. पण ही चूक मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली. पक्षश्रेष्ठींकडून पुढे मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन मिळालं आहे’, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या विदय वडेट्टीवार यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेनंतरच त्यांची नाराजी दूर झाली असल्याचं स्पष्ट झालं.


हेही वाचा – विजय वडेट्टीवारांची नाराजी उघड, विशेष अधिवेशनात अनुपस्थित!

म्हणून मी नाराज होतो – वडेट्टीवार

दरम्यान, मदत आणि पुनर्वसन खात्याच्या अतिरिक्त भारासोबतच आज त्यांनी ओबीसी आणि खार जमिनी विकास विभागाचा पदभार देखील स्वीकारला. दरम्यान, माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी ‘माझ्या नाराजीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या वाट्याला आलेलं खातं शिवसेनेकडे गेलं होतं. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खाते आहे. ते शिवसेनेकडे गेलं होते,’ असे सांगत आपल्या नाराजीचे खरे कारण त्यांनी सांगितले.

- Advertisement -

‘म्हणून विशेष अधिवेशनाला गैरहजर राहिलो’

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी नुकत्याच झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला आणि विशेष अधिवेशनाला दांडी मारली होती. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ‘माझं वैयक्तिक काम होतं आणि याबाबत मी बाळासाहेब थोरातांना सांगून गेलो होतो’, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘माझा फोन बंद नव्हता. एवढंच नाही तर मी कुटुंबासोबत असल्याचं सांगत विधानसभा निकालानंतरही मला कुटुंबाला वेळ देता आला नव्हता. त्यामुळे मी कुटंबासोबत होतो. तसेच आज देखील दुपारी मी जाणार आहे आणि सोमवारपासून पुन्हा टी-२० सुरूच होणार आहे’, असं देखील वडेट्टीवार यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -