घरमहाराष्ट्र'केला इशारा जाता जाता' सिनेमा बघा; शिवसेनेला इशारा देणाऱ्या मनसेला राऊतांचा खोचक...

‘केला इशारा जाता जाता’ सिनेमा बघा; शिवसेनेला इशारा देणाऱ्या मनसेला राऊतांचा खोचक टोला

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ओवैसी म्हटल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्मरक झाले आहेत. मनसैनिकांनी सामनाच्या कार्यालयाबाहेर बॅनर लावत इशारा दिला. त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर देताना खोचक टोला लगावला. इशारा देणाऱ्या मनसेला राऊत यांनी केला इशारा जाता जाता हा चित्रपट बघा, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे.

५० वर्ष आम्ही अशी इशारे घेऊन फिरतोय. एक सिनेमा होता केला इशारा जाता जाता…तो जरा त्यांना पाहायला सांगा, असं राऊत म्हणाले. राऊत यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये बोलताना भाजपकडून ज्या पद्धतीने एमआयएम आणि असदुद्दीन ओवैसी यांचा वापर करुन घेण्यात आला, त्याचपद्धतीने महाराष्ट्रात भाजप मनसेचा वापर करत आहे.

- Advertisement -

रामाचा धनुष्य आणि हनुमानाची गदा आमच्याकडेच

राज्यात आज राजकीय हनुमान जयंती जोरदार सुरु आहे. त्यावर देखील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “काही लोकांनी राजकीय हनुमान जयंती साजरी करण्याचा चंग बांधला असेल तर ती त्यांना लखलाभ ठरो. राम असतील, हनुमान असतील ही आमची कायम शक्तीस्थानं राहिली आहेत. ही सर्व दैवतं आहेत, ही सदवै आमच्या पाठीशी आहेत. रामाचा धनुष्य देखील आमच्याकडे आहे, आणि हनुमानाची गदा सुद्धा आमच्या हातामध्ये आहे. कोल्हापूरचा निकाल पाहिला असेल राम आणि हनुमानाचं कितीही राजकारण केलं तरी दोन्ही दैवतं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या पाठीशी आहेत
हे आता स्पष्ट झालं असेल. कोल्हापूरची निवडणूक जिंकण्यासाठी त्याच काळामध्ये हे सगळे भोंग्याचे प्रकार सुरु केले. पण त्यांचा भोंगा वाजला नाही, त्यांचा भोंगा वाजणार नाही, त्यांना जनता ठेंगाच दाखवणार,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -