घरक्रीडाT20 world cup : टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाज विरोधी संघाची डोकेदुखी ठरणार,...

T20 world cup : टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाज विरोधी संघाची डोकेदुखी ठरणार, संधी देण्याची पाकिस्तानच्या खेळाडूची मागणी

Subscribe

भारतात सध्या लोकप्रियतेच्या शिगेला पोहचलेल्या इंडियन प्रिमिअर लीग २०२२ मुळे अनेक तरूण खेळाडूंना वेगवेगळ्या फ्रॅंचायसीमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यंदाच्या आयपीएलच्या मालिकेत आणखी दोन संघांची भर पडली आहे. अनेक खेळाडूंनी आपले टॅलेन्ट यंदाच्याही आयपीएलच्या हंगामात दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये प्राधान्याने नाव घेतले जात आहे ते म्हणजे उमरान मलिकचे. आपल्या जलदगती गोलंदाजीने उमरानने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. २२ वर्षीय उमरान मलिकने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्युट केला. पण सध्याच्या फ्रॅंचायसीसाठी उमरान मलिकची कामगिरी ही सातत्यपूर्ण अशी राहिली आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना उमरान दिसाला आहे.

शुक्रवारीही उमरान मलिकने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात चार ओव्हरमध्ये २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरला यॉर्कर टाकून इमरानने बाद केले. तर शेल्डन जॅक्सनलाही त्याने बाद केले. पाकिस्तानचा माजी कॅप्टन राशीद लतीफने उमरानचा परफॉर्मन्स पाहता भारताने आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये या खेळाडूला संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. येत्या वर्षाच्या अखेरीस टी २० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होऊ घातला आहे. त्यामुळे हा खेळाडू ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास राशील लतीफने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आयपीएल मालिका संपल्यानंतर भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयारी करणार आहे. त्यामध्ये सर्वात आधी आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठीची तयारी भारतीय संघाकडून करण्यात येणार आहे. टी २० सामन्यांमध्ये आशियाई संघांसाठी उमरान मलिक डोकेदुखी ठरू शकतो. त्यामध्ये श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणीस्थान अशा अनेक संघांना भारतीय संघाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ त्याच्याविरोधात चांगला खेळू शकतो असा विश्वास लतीफने व्यक्त केला आहे.

अनेक खेळाडू ताशी १५० किमी या वेगाचे बॉल खेळण्यात असमर्थ ठरत आहेत. तर अनेक गोलंदाजांचाही वेग कमी झाला आहे. त्यामध्ये मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. शाहीन आफ्रिदी हा उत्तम स्विंग गोलंदाजी करतो, पण त्याच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १४५ किमी इतकीच आहे. त्यामुळेच भविष्यात एक मोठ नाव कमावण्याची संधी उमरान मलिककडे असल्याचे भविष्य राशीद लतीफने वर्तवले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -