घरमहाराष्ट्रवॉटर कप २०१८- साताऱ्यातील टाकेवाडी ठरले विजेते

वॉटर कप २०१८- साताऱ्यातील टाकेवाडी ठरले विजेते

Subscribe

विजेत्या गावाला पाणी फाऊंडेशनकडून ७५ लाखाचा चेक, पुरस्कारादरम्यान राजकीय नेत्यांची शेरेबाजी.

सत्यमेव जयतेद्वारे पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वॉटरकप २०१८ स्पर्धेचा परितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला. सातारा जिल्ह्यामधील मांड तालूक्यातील टाकेवाडी आंधळी गावाचा वॉटर कप स्पर्धेचे प्रथम विजेते ठरले आहे. साताऱ्यातीलच भांडवली गावाचा द्वितीय क्रमांक आणि बीडमधील आनंदवाडी गावाचा तिसरा क्रमांक लागला आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, किरण राव सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या गावाला प्रथम बक्षीस मिळाले आहे. जिकल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोशात आनंद साजरी केला. पुणे येथील बालेवाडी मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांना संस्थेतर्फे पाणी वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ४५ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत गावकरी आपले श्रमदान करुन मशीनच्या सहाय्याने पाणी साठवण क्षमता निर्माण करतात. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारीत होते. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावास स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमिर खानतर्फे आमंत्रण पत्र पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

राज-दादांमध्ये पाणी-बाणी

वॉटरगेट स्पर्धेतून मिळालेल्या पैशावरुन राजकीय वर्तुळात कसून शेरेबाजी सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी एकमेकावर कसून टीका केली. कार्यक्रमात जगजाहीरपणे यादोघांनी एकमेकांवर टीका केली.

काय झाले संभाषण

- Advertisement -

“आमिर खान यांच करव तीतक कौतूक कमी आहे. या कार्यक्रमात अगोदरचे आणि आताचे सरकार दोन्ही उपस्थीत आहेत. सरकारकडून मिळणारा इरिगेशनचा पैसा गेला कुठे हे मला यावेळी विचारावस वाटते? पाणी फाऊंडेशन मध्ये जर सरकारी अधिकारी काम करत असतील तर सरकारी कामांमध्ये हे अधिकारी काम का नाही करत? असे सर्वसामान्यांना जे प्रश्न पडतात ते मलाही पडतात आहे. धर्म, जात,पक्ष याच्या पलीकडे पाणी आहे जे सर्वांना जगवते. या पाण्याला वाचवण्याचा काम करत असलेल्या आमिरखानला धन्यवाद देतो.”- राज ठाकरे

“आमिर खान तुम्ही खुप चांगलं काम करत आहात. कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही तुमच्यावर राजकीय शिक्का मारून घेऊ नका. तसेच काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायच्या असतात.” – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -