घरदेश-विदेशए एन्जॉय!! मित्रांना वाटली लाखोंची रक्कम!!

ए एन्जॉय!! मित्रांना वाटली लाखोंची रक्कम!!

Subscribe

फ्रेंडशिप डेचे निमित्त करत जबलपूरमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तब्बल ४५ लाख रूपये मित्रांना वाटले.

अरे, तु फक्त बोल! तेरे लिए तो अपनी जान भी हाजीर है! असे एक ना अनेक डायलॉग आपण मित्रांना वापरतो. मैत्रि म्हटलं की काहीही करायची तयारी. मैत्रि म्हटलं की शिव्या, श्राप, भांडण, राडा सर्व गोष्टी आल्या. पण पैशाचा बाबतीत मात्र प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. कोण मित्र कंजुष म्हणून मनसोक्त शिव्या घातलो. तर काही जण मित्र दिलदार म्हणून त्याची मनसोक्त स्तुती करतात. भुक्कड, भिकारी, हावरा, सावकार एक ना अनेक विशेषणे आपण आपल्या मित्रांना वापरत असतो. काय रे भिकाऱ्या १०० रूपये उधार घेतलेस, ते केव्हा परत करतोय? एक ना अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा अनुभव आपण घेत असतो. पण एखाद्या मित्रांने तुम्हाला लाखो रूपये असेच वाटले, तर? तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? आता तुम्ही म्हणाल, आमच्या नशीबात एवढा श्रीमंत मित्र कुठेय राव? अहो, पण तुमचा मित्र एवढा दिलदार नसला म्हणून काय झाले? पण असे नशीब काढणारे मित्र देखील या दुनियेत आहेत बरं का?

त्याने चक्क ४६ लाख रूपये मित्रांना वाटले!!

त्याचं काय आहे मित्रांनो! मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने फ्रेंडशिप डेचे निमित्त करत तब्बल ४६ लाख रूपये त्याच्या मित्रांमध्ये वाटले! आता तोंडामध्ये बोट घालू नका. ही कोणतीही अफवा नाही. ही सत्य घटना आहे. आता तुम्ही म्हणाल काय नशीब काढले राव या पोरांनी! पण जरा थांबा. दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांने ४५ लाख रूपये मित्रांना वाटले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचे वडील पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. घरं विकल्यानंतर या दिलदार विद्यार्थ्याच्या वडीलांनी ६० लाखांची रक्कम घरातील कपाटामध्ये ठेवली होती. त्यातील ४५ लाखांची रक्कम या पट्ट्याने नेऊन मित्रांमध्ये वाटली. ज्यावेळी कपाटातील पैसे कमी झाल्याची बाब वडीलांच्या लक्षात आली त्यानंतर तडक त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील वेगाने तपासाला सुरूवात केली. त्यावेळी पैसे घरातील व्यक्तीनेच नेल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. यावेळी अधिक चौकशी केल्यानंतर पैसे मित्रांमध्ये वाटल्याची कबुली मुलाने दिली. विशेष म्हणजे तब्बल १५ लाखाची रक्कम मिळाल्यानंतर त्यातील एक मित्र गायबच झाला. या विद्यार्थ्याच्या मुलाने ज्या – ज्या मित्रांना लाखो रूपये वाटले त्यांची यादी पोलिसांना दिली गेली आहे. सर्वाधिक रक्कम मिळालेल्या ५ जणांच्या पालकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. शिवाय, ५ दिवसांमध्ये पैसे परत करा असे देखील या नोटीसीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

काय केले लाखो रूपयांचे?

आता लाखो रूपये मिळाल्यानंतर मित्रांनी काय बरे केले असेल? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? नाही का? आता एकदम लाखो रूपये कोणतीही मेहनत न करता केल्यावर एका मित्राने तर चक्क कार विकत घेत जीवाची मुंबई केली. तर, दुसरा मित्र कुठे गायब झाला? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. आता दिलदार मित्राकडून लाखो रूपये मिळणे ही गोष्ट एकवेळ समजून देखील घेता येईल. पण, दहावीतील मुलांकडे लाखो रूपये आले कुठून? याची साधी चौकशी देखील पालकांना करावी वाटली नाही. हे विशेष! त्यामुळे तुम्हाला देखील कुणी असे लाखो रूपये मैत्रि खातर दिल्यास थोडा विचार करा. आता तुम्ही म्हणाल आमचे नशीब कुठेय? ते काहीही असो. तुमचे मित्र दिलदार असोत किंवा नसोत. पण नशीब केव्हा फळफळेल याचा काही नेम नसतो. म्हणून थोडी खबरदारी बाळगा म्हणजे झाले!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -