घरठाणे'व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही'; 'त्या' प्रकरणावर श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

‘व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही’; ‘त्या’ प्रकरणावर श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

शुभदीपजवळील रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला. मात्र, याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना शिंदे कुटुंबियांना देण्यात आली नव्हती. तसंच, रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याने शिंदेंच्या व्हीआयपी कल्चरवर विरोधकांकडून टीका केली जात होती. यावर आता खासदार, श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ठाणे: मराठा आरक्षणावरून राज्यात रान उठवलं जात आहे. अनेक नेते, आमदार आणि खासदारांची मराठा आंदोलकांकडून अडवणूक सुरू आहे. अनेक हिंसक घटनादेखील घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच, शुभदीपजवळील रस्ता हा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला. मात्र, याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना शिंदे कुटुंबियांना देण्यात आली नव्हती. तसंच, रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याने शिंदेंच्या व्हीआयपी कल्चरवर विरोधकांकडून टीका केली जात होती. यावर आता खासदार, श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (We don t accept VIP culture Shrikant Shinde clarified his position on blocked the road of his Shubhdeep house in Thane for Public)

श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आमचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक बुधवारी जारी केले आहे. त्या पत्रकात मुख्यमंत्र्यांचे कुटुंबियांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतुकीत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती.

- Advertisement -

वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिध्दी माध्यमे आणि सोशल मीडीयावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलीस अधिकाऱ्यांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे-जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय आहे. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला.

त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

श्रीकांत शिंदे म्हणाले की,  पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी. तसेच, हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्वीप्रमाणेच खुला ठेवावा.

- Advertisement -

(हेही वाचा: सत्ताधारी पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांबाबत सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला प्रश्न, केंद्राने उत्तर देत सांगितले… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -