घरमहाराष्ट्रआपल्यात महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद; ताकदीने उभे राहा - जयंत पाटील

आपल्यात महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद; ताकदीने उभे राहा – जयंत पाटील

Subscribe

शिबिरात शेवटच्या दिवशी जयंत पाटील यांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन यावेळी मांडले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. राज्यात ज्याप्रकारे सरकार यायला हवे ते आले नाही

मुंबईः सरकार गेलं की चिंता करायची नाही. एवढं काम करू की महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत. ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय शिबिरात जयंत पाटील बोलत होते. आम्हाला हिंदुत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. त्यामुळे आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

शिबिरात शेवटच्या दिवशी जयंत पाटील यांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन यावेळी मांडले आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. राज्यात ज्याप्रकारे सरकार यायला हवे ते आले नाही. भाजपच्या 105 मध्ये अस्वस्थता आहे, कारण हे सरकार 40 जणांसाठीच काम करत असल्याची भीती भाजप नेत्यांमध्ये आहे, असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी आणि पवारसाहेब काय करतात, याबाबत राज्यात चर्चा असते. आपण कुणाशी लढणार आहोत, याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबिरात झाले. आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलतात, त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

सोयीचे असेल ते कसे वाजवायचे आणि आपण बोलतो तेच बाहेर वाजते त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असं विचारणारा मंत्री या मंत्रिमंडळात आहेत. हे कोणत्या पातळीवर आहेत लक्षात येत आहे, त्याविरोधात आपली लढाई असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टी झाली त्या सर्व ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारा ठराव आज या शिबिरात करण्यात आला. महाराष्ट्रासोबत दुसरं राज्य स्पर्धा करू शकत नाही, परंतु घाबरून दुसर्‍या राज्यात जाणारा प्रकल्प थांबवला जात नाही, याबाबत तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पूल पडणे हा ईश्वरी संकेत, असे मोदी पश्चिम बंगालच्यावेळी बोलले असतील तर आता गुजरातमध्ये हा संकेत दिसला पाहिजे, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

विधानसभेत आपल्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. रोहित पवार, अनिल पाटील, अमोल मिटकरी, यांच्यासह अनेक आमदारांना विधानसभेत थांबा, असं बोलावं लागतं आहे, अशी कामगिरी आहे. ही नवीन पिढी राष्ट्रवादीचा रथ पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी विधानसभेतील युवा आमदारांच्या कामकाजावर बोलताना व्यक्त केला. आपला पक्ष ताकदीने उभा करू या. पुढच्या काळात सक्षम व सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे हे चित्र निर्माण करू या. 23 वर्षांत चार वेळा सत्ता स्थापन करायला मिळाली आहे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपला पक्ष काम करतोय. 2024 ला राष्ट्रवादीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे ताकदीने काम केले तर एक नंबरचा पक्ष बनेल, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचाः राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे आदेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -