घरताज्या घडामोडीबाळासाहेबांचं स्मारक फक्त संग्रहालय नाही तर स्फूर्तिस्थान - उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचं स्मारक फक्त संग्रहालय नाही तर स्फूर्तिस्थान – उद्धव ठाकरे

Subscribe

येत्या १७ तारखेला १० वर्ष पूर्ण होतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा १० वा स्मृतीदिन आहे. १० वर्ष उलटून गेली असून स्मारकाचा विषय चर्चेला येतो. नेमकं स्मारक कधी आणि कसं होणार आहे, याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे. त्यामुळे जनतेला माहिती मिळावी, अशा एका टप्प्यातून भेटीमागचा उद्देश आहे. आता आपण जे प्रेझेंटेशन पाहिलं ते एका बेसिक स्वरूपाचं प्रेझेंटेशन आहे. नेमक्या तिथे आणखीन काही गोष्टी आपण करणार आहोत. ते सर्व करण्यासाठी आपल्या सर्वांची मदत आणि सहकार्य अपेक्षित आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल याचं सादरीकरण करण्यात आलं. अनेक जणं मला विचारतात की येथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की येथे पुतळाच नसेल. माझी कल्पना आहे की, पुतळा म्हणजे स्मारक नाही. हे नुसतं संग्रहालय नाहीये. हे म्यूझियम म्हणजे स्फूर्तीस्थान आणि प्रेरणास्थान असणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर जे कार्य केलं. तेच कार्य हे त्यांचं स्फूर्तिस्थान पुढील अनेक वर्ष करणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

गेल्या दोन ते चार वर्षात आम्ही बऱ्याच बैठका घेतल्या. काही प्रसिद्ध व्यक्ती ज्या म्यूझिअमच्या बाबतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. तंत्रज्ञान आणि माध्यमं कोणती असायला पाहीजेत. मुद्दे काय असायला पाहीजेत हे महत्त्वाचं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांनी अनेक भाषणं दिलं. ती भाषणं केवळ द्यायची म्हणून दिली नाहीतर जनतेत एक जागृती निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राला, हिंदुस्तानला काहीतरी देण्यासारखी भाषणं आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काहींना वाटतयं की, वेळ लागतोय, मात्र ती हेरिटेज वास्तू आहे. त्या वास्तूला धक्का न पोहोचवता काम करतो आहोत. संग्रहालयाला धोका पोहोचणार नाही असं बांधकाम करावं लागतंय, बाजूला समुद्र देखील आहे, जमिनीखाली देखील बांधकाम करावं लागतंय. मी काही वृत्तपत्रांच्या संपादकांशी देखील बोललो आहे. भाषणं, मोर्चे आहेत. 1966 नंतरची काही भाषणं आपल्याकडे उपलब्ध नाहीत. ती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मार्मिकचे सर्व अंक रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : २०२४ च्या निवडणुकीत मविआला उमेदवारही मिळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -