घरमहाराष्ट्रWeather Update : शेतकऱ्यांनो शेतीची कामे उरका, हवामान खात्याने वर्तवला मोठा अंदाज

Weather Update : शेतकऱ्यांनो शेतीची कामे उरका, हवामान खात्याने वर्तवला मोठा अंदाज

Subscribe

भारतीय हवमान विभागा (IMD) ने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात येत्या 24 तासांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई : तीन ऋतूपैकी आरोग्यदायी ऋतू असलेल्या हिवाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री घेतली आहे. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतानाच दुसरीकडे मात्र, याच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अशातच आज सोमवारी (27 नोव्हेंबर) रोजी भारतीय हवामान खात्याने वर्तवला असून, येत्या 24 तासांत महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Weather Update Farmers should finish farming Meteorological department has predicted big forecast)

भारतीय हवमान विभागा (IMD) ने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात येत्या 24 तासांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आहेत ती शेतीकामे उरकून घेण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

महाराष्ट्र राज्यासाठीही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, मुंबई आणि दिल्लीमध्येही सोमवारी (27 नोव्हेंबर) पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : शिक्षक भरतीवरून भावी शिक्षिकेचा केसरकरांवर प्रश्नांचा भडीमार; शिक्षणमंत्र्यांचा मात्र श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला

- Advertisement -

बर्फवृष्टी होण्याची शक्यता

28 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमध्ये पाऊस पडू शकतो. छत्तीसगडच्या अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर 26 नोव्हेंबरपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाला असून, वेस्टर्न डिस्टर्बन्सची तीव्रता हलकी ते मध्यम आहे, त्यामुळे जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता नाही. 27 नोव्हेंबरपर्यंत किन्नौर, लाहौल-स्पीती, कुल्लू,आणि शिमला भागात बर्फवृष्टी होईल.

हेही वाचा : गिरीश महाजनांना मारण्यासाठी मी नवीन जोडे घेतलेयत; खडसे- महाजन वाद विकोपाला

अवकाळीचा महाराष्ट्रातील या पिकांना फटका

सध्या महाराष्ट्रात रब्बी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा पिकाची पेरणी केली आहे. या पिकांसाठी हा अवकाळी पाऊस वरदान जरी ठरत असला तरी खरीपातील कडधान्याचे पीक म्हणून ओळख असलेलं तूरपीक फुलोऱ्यात असून, त्याची गळती होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर अर्ध्यावर आलेल्या कापूस पीक पाण्यात जाण्याची शक्यात आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -