घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरशिक्षक भरतीवरून भावी शिक्षिकेचा केसरकरांवर प्रश्नांचा भडीमार; शिक्षणमंत्र्यांचा मात्र श्रद्धा अन् सबुरीचा...

शिक्षक भरतीवरून भावी शिक्षिकेचा केसरकरांवर प्रश्नांचा भडीमार; शिक्षणमंत्र्यांचा मात्र श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला

Subscribe

शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रविवारी (26 नोव्हेंबर) रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. दौऱ्याअंती ते मीडियाशी संवाद साधत असताना तेथे अचानक एक भावी शिक्षिका आल्या.

बीड : राज्यात सत्तांतर झाले असतानाही अद्यापही सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच पडून आहेत. यापैकी एक प्रश्न म्हणजे शिक्षकभरती. अद्यापही राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील भावी शिक्षक पाण्यात देव बुडवून बसले आहेत. तर काही भावी शिक्षकांच्या संयमाचा बांध फुटला असून, ते आता सरकारवर रोष व्यक्त करत आहेत. असाच एक प्रकार बीड जिल्ह्यात घडला असून, भावी शिक्षकेने दौऱ्यावर असलेले मंत्री दीपक केसरकरांवर प्रश्नांचा भडीमार केला. याला मात्र शिक्षणमंत्र्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला. (Prospective teacher bombards Kesarkar with questions on teacher recruitment However, Shraddha and Saburi’s advice from the Education Minister)

शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रविवारी (26 नोव्हेंबर) रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. दौऱ्याअंती ते मीडियाशी संवाद साधत असताना तेथे अचानक एक भावी शिक्षिका आल्या. त्यांनी शिक्षणमंत्र्यांना एक नव्हे तर अनेक प्रश्न विचारत भांडावून सोडले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संविधान बदलण्याच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, आंबेडकर हे स्वत: बॅरिस्टर…

या शिक्षिका म्हणाल्या, भरतीची वाट पाहून थकलोय

शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी दौऱ्याअंती ते माध्यमांशी संवाद साधत असताना त्यावेळी भावी शिक्षिकेची एंट्री झाली. त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की, शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही खूप थकलो आहोत. संकेतस्थळ सुरू आहे, नोंदणी सुरू आहे, पण पुढे प्रक्रिया होतच नाही. जाहीरातच आली नाही, तर चॉइस कसा देणार? जाहीरात कधीपर्यंत येणार? आम्ही पाच वर्षापासून जाहिरातीची वाट पाहतोय, अशा प्रश्नांची सरबत्ती महिलेने दीपक केसरकरांना केली.

- Advertisement -

हेही वाचा : संविधान बदलण्याच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, आंबेडकर हे स्वत: बॅरिस्टर…

तुम्हा श्रद्धा आणि सबुरी ठेवा

भावी शिक्षिकेने दीपक केसरकरांना प्रश्न विचारल्यानंतर दीपक केसरकर यांनी काहीसे नरमाईने तर काहीसे कडक शब्दांत उत्तरे दिली. ते म्हणाले की, भरती प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू आहे. भरती सुरू झाली आहे, काहीशी श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आजपर्यंत पाच वर्षात कुणी शिक्षक भरती केली का? मी केली आहे. मी माध्यमांशी संवाद साधतोय, त्यात तुम्ही येता. मी जेवढा प्रेमळ, तेवढा कडकही आहे. माझ्या दृष्टीने विद्यार्थी महत्वाचे आहेत. मी 30 हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्या तुम्ही मुलांनाही ही बेशिस्त शिकवत असाल, तर मला मान्य नाही. कारण, मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच हवे आहेत अशा शब्दांत दीपक केसरकरांनी त्या भावी शिक्षिकेस उत्तरे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -