घरमहाराष्ट्रराज्यात पुढील 4 दिवस थंडीचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना इशारा

राज्यात पुढील 4 दिवस थंडीचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Subscribe

देशात मागील काही दिवसांपासून पावसाचे ढग दाटले होते. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यात मेंडोंस चक्रीवादळाचा परिणाम सध्या कमी झाल्याने तापमानात कमालीची घट झाली. यात महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान या राज्यात थंडीची लाट आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सध्यातरी पावसाची स्थिती नसल्याने दुपारी उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. यात सायंकाशी किमान तापमानात घट होताना दिसत आहे. राज्याच्या काही भागांत गारठा जाणवत आहे. आज महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे,

- Advertisement -

तर रत्नागिरीत सर्वात उच्चांकी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 30 अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही 11 ते 20 अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. यात पहाटे गारठा, तर दुपारी कडक उन्ह आणि रात्री पुन्हा गारठा अशी स्थिती अनुभवायला मिळते. यात धुळ्यात तापमानात घट होत ते 11 अंशावर पोहचेले आहे. चर औरंगाबादेत 11 अंश निफाड येथे 11.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशांच्या दरम्यान पोहचला आहे.

सध्या राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्याने हुडहु़डी वाढली आहे. परिणामी 25 डिसेंबर मुंबईत थंडी वाढणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली असून औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस आहे.


सिक्कीममध्ये लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात, 16 जवानांचा मृत्यू, 4 जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -