घरमहाराष्ट्रWeather Update : मुंबईत 'या' तीन दिवशी पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र,...

Weather Update : मुंबईत ‘या’ तीन दिवशी पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही शक्यता

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात थंडी जाणवू लागली आहे, मात्र नोव्हेंबर महिना संपायला आला तरी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. अशातच पुणे हवामान विभागाने 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे, तर पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Weather Update Rain forecast in Mumbai for three days Possibility in Konkan Madhya Maharashtra Marathwada also)

हेही वाचा – राज्यातील शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने द्यावी – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली येथे मेघगर्जनेसह एक-दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव याठिकाणी पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित विभागांमध्ये शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड येथे हलक्या सरींची शक्यता आहे तर, उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत ‘लक्ष्मी’ झाली प्रसन्न; इतक्या कोटींचे उत्पन्न

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये पावसाचा अंदाज का?

हिवाळी मोसमी वारा व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार आहे. चक्रीय वाऱ्यंचा परिस्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीय वारे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करुन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या एक-दोन दिवसांत चक्रीय वाऱ्याची स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बिजे रोवण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होऊन बांग्लादेशाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाही. मात्र शनिवार ते सोमवार या तीन दिवसांमध्ये राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -