घरमहाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने द्यावी - देवेंद्र फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने द्यावी – देवेंद्र फडणवीस

Subscribe

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक शासकीय पूजा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती मोठे संकट आले आहे. राज्यातील शेतकऱ्याला समाधानी करण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी, असे साकडे देवेंद्र फडणवीसांनी विठुरायाच्या चरणी घातले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंढरपूचे बदललेल स्वरूप पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना मिळो, माझ्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा सुखी झाला पाहिजे. आज राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या शेतकऱ्यांना समाधानी करण्याची शक्ती विठ्ठरायाने आम्हाला द्यावी. राज्यातील अनेक मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी आणि आदिसवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. माऊलींनी पसायदानामध्ये सर्वांनासाठी प्रार्थना मागितली आणि त्याच पद्धतीने विठुरायाच्याचरणी मागणी मागतो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आम्हाला ताकद द्यावी.”

- Advertisement -

हेही वाचा – Kartiki Ekadashi : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा

विकास करताना कोणालाही विस्थापित करायची भावना नाही

विठ्ठल मंदिराच्या विकास आराखडासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र धर्म हा वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून माणसे बदलली पण त्यांची श्रद्धा बदलेली नाही. आपण आज विकास आराखडा तयार केला आहे. यामुळे विठ्ठल मंदिरांचे संवर्धनाचे काम केले करणे हीच आमची भूमिका आहे. यासाठी 75 कोटी रुपयांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आज झाले असून विठ्ठल मंदिराशी कोट्यावधी लोकांच्या भावना जोडल्या आहेत. यामुळे लवकर आणि उत्तम काम झाले पाहिजे. यासाठी पंढरपूर विकास आराखडा हा सर्वांना घेऊन काम करायचे आहे. विकास करताना कोणालाही विस्थापित करायची आमचा आणि मुख्यमंत्राचा भाव नाही, हे देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता आपली पंढरपुराची वारी ही वारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. यामुळे पंढरपूरात तशा पद्धतीच्या व्यवस्था देखील उपलब्ध करून दिल्या पाहिजे, यासाठी काम करत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -