घरदेश-विदेशLive Update : भाऊ चौधरींची हकालपट्टी.., खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती

Live Update : भाऊ चौधरींची हकालपट्टी.., खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती

Subscribe

भाऊ चौधरींची हकालपट्टी.., खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती


चीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

- Advertisement -

विधानसभा सभागृहाची बैठक सात वाजून 36 मिनिटांनी संपली

उद्या सकाळी 9 ते 10.45 पर्यंत विशेष बैठक व नियमित बैठक 11 वाजता सुरू होईल

- Advertisement -

नवनीत राणांना दिलासा नाहीच, दोषमुक्ततेसाठीचा अर्ज फेटाळला

जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका


सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर ठाकरेंवर राहुल शेवाळेंचा आरोप

रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ एयू कॉल होते

एयू म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं- राहूल शेवाळे


मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पिकनीकला गेलेल्या शाळेच्या बसचा अपघात

अनेक विद्यार्थी गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

बस थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालय, याईरीपोकची होती आणि खौपूमकडे जात होती


आर्यन खानला दिलासा, आव्हान देणारी याचिका फेटाळली

आरोपपत्रातून नाव वगळल्याने आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती

ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली


अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

सीबीआयचा अर्ज कोर्टात मंजूर

जामीन मिळूनही सीबीआयच्या अर्जामुळे जामिनावर स्थगिती

२७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग


ड्रग्सविरोधात बहुआयामी लढाई लढावी लागेल, केंद्र आणि राज्यांनी एकत्र यावं

अंमलीपदार्थामुक्त भारत होण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आवाहन

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही कार्यरत व्हायला हवं

पूनर्वसन आणि व्यसनमुक्तीसाठी समाजकल्याण विभागा आणि आरोग्य मंत्रालयानेही एकत्र राहायला हवं

या सर्व आयामांना सहभागी करतोय तर या लढाईत सर्वांना एकत्रित आले तरच ड्रग्सफ्री भारत साकार होईल

ही लढाई केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून लढली पाहिजे

ड्रग्सविरोधात लढाईचा प्रश्न आहे तेव्हा राज्यांनी केंद्राला साथ दिली पाहिजे


गर्दीत जाताना मास्कचा वापर करा, लसीचे डोस घ्या, मनसूख मांडवीयांचे आवाहन

27-28 टक्के लोकांनीच बुस्टर डोस घेतले, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा


संतोष बांगरांची जीभ घसरली, संजय राऊतांवर टीका

राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा, बांगरांची जीभ घसरली

संजय राऊतांच्या कानशिलात लगावल्याशिवाय गप्प बसणार नाही, संतोष बांगरांची टीका


लातूरमध्ये लव्ह जिहादविरोधी मोर्चा

व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन

हिंदू जनआक्रोश मोर्चा


मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड, वडिलांची हत्या

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसंच, दोन भाऊ जखमी आहेत.


मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ लक्झरी बसला आग

शॉर्टसर्किटमुळे आग लागली

३५ प्रवासी बसमध्ये, सुदैवाने जीवितहानी नाही


काहिलीपासून सुटका, राज्यात किमान तापमानात घट


अहमदनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन


अनिल देशमुखांच्या जामीनावर आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी


मुंबईत सिद्धीविनायक मंदीर येथे मनसे आंदोलन करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -