घरताज्या घडामोडीWeather Updates: उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टीमुळे लोकं हैराण; महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील...

Weather Updates: उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टीमुळे लोकं हैराण; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस कोसळणार पाऊस

Subscribe

महाराष्ट्रामध्ये विदर्भात ९ ते ११ जानेवारीपर्यंत विजांच्या कडकडाटांसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून देशातील हवमानाची स्थिती बिघडली आहे. एकाबाजूला जम्मू-काश्मीर, हिमाचाल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टी सुरू आहे. तर दुसऱ्याबाजला पंजाब, हरयाणा, दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रासह पूर्व उत्तर भारतात सातत्याने पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भात ९ ते ११ जानेवारीपर्यंत विजांच्या कडकडाटांसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे स्थानिक लोकांना अनेक समस्येंचा सामना करावा लागत आहे. जास्त करून काही भागांमध्ये बर्फवृष्टीने तांडव घातला आहे. लोकं घरातच बंदिस्त झाले आहेत. रस्ते बर्फाने भरलेले आहेत. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पुढील १२ तासांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान श्रीनगर एअरपोर्टवरील बर्फ बाजूला करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती श्रीनगर एअरपोर्टकडून देण्यात आली.

- Advertisement -

तसेच लेह आणि आजूबाजूच्या प्रदेशात हवाई वाहतूक सुरू झाली आहे.

- Advertisement -

आजही राजधानी दिल्लीत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

 

आज कसे असेल हवामान?

उत्तर भारतातील हवामान बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्रातून आर्द्रता राहणार आहे. यामुळे मध्य भारतात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येतील. यामुळे महाराष्ट्रात ९ ते ११ जानेवारीदरम्यान विदर्भातील काही भागात हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर ९ ते ११ जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितली. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, तर आज राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आज हिमाचल प्रदेशमध्ये हलका आणि मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तरांखडमध्ये हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

तसेच पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पंजाब, हरयाणा आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या स्वरुपात सुरू आहे.

उत्तर प्रदेश, पूर्व आणि मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पुढील २४ तासांत बिहार आणि झारखंडच्या काही भागात आणि ओडिसा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.


हेही वाचा – Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन सेवेत अडथळे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -