घरमहाराष्ट्रशेतकरी-आदीवासींच्या 'उलगुलान मोर्चा'चा नेमका अर्थ काय?

शेतकरी-आदीवासींच्या ‘उलगुलान मोर्चा’चा नेमका अर्थ काय?

Subscribe

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील आदिवासी, शेतकरी विधानभवनावर चालून आले आहेत. मुंबईत धडकलेल्या या मोर्चाला उलगुलान असे नाव देण्यात आले आहे. उलगुलान या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? याचा शोध

महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यातून तब्बल १२ हजार शेतकरी आज मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या मागण्या घेऊन आले आहेत. लोकसंघर्ष मोर्चाने या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले आहे. या मोर्चाला उलगुलान मोर्चा असेही नाव देण्यात आले आहे. मात्र उलगुलान म्हणजे नक्की काय? हा शब्द आला कुठून? याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उलगुलान मोर्चा आजवर अनेकदा विधानभवनावर काढण्यात आलेला आहे. विशेषतः आदिवासी आपल्या संघर्षासाठी उलगुलान हे नाव धारण करत असतात. या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता बिरसा मुंडा यांनी…

हजारो आदिवासी, शेतकरी मंत्रालयावर धडकणार

इंग्रजी राजवटीत ब्रिटिशांविरोधात आदिवासींनी रणशिंग फुंकले होते. आदिवासींनी सुरु केलेल्या या आंदोलनाचे जनक होते क्रांतिकारक बिरसा मुंडा. बिहारमधून त्यांनी इंग्रजांविरोधात चळवळ सुरु केली. या आंदोलनाला त्यांनी उलगुलान असे नाव दिल्याचे म्हटले जाते. उलगुलान या शब्दाचे अनेक अर्थ निघतात म्हणजेच. सार्वजनिक उठाव, बंड किंवा क्रांती, असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास शोषितांनी आपल्या न्याय-हक्कांसाठी उभारलेला लढा म्हणजे उलगुलान…

- Advertisement -
पहा आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या मोर्चामधील शिस्तबद्धता!

बिरसा मुंडा हे १९ व्या शतकातले आद्य क्रांतिकार होते. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकजण आदिवासींच्या न्याय-हक्कासाठी लढताना दिसतात. महाराष्ट्रात उलगुलानचा लढा उभारलाय नाशिकच्या प्रतिभा शिंदे यांनी. कॉलेजपासून विविध सामाजिक चळवळींशी नाळ जोडलेल्या प्रतिभा या नर्मदा आंदोलनापासून लोकांच्या प्रश्नांसाठी भांडत आहेत. आजवर त्यांच्यावर अनेक खटले देखील दाखल केलेले असून त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे.

प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवनावर हजारो आदिवासी-शेतकरी बांधवांनी मोर्चा काढलेला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख नेतृत्वाखाली श्रमिक एल्गार विदर्भ आणि लोकशासन आंदोलन, पश्चिम महाराष्ट्र या मोर्चात सहभागी आहेत. तसेच राष्ट्र सेवादल, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना आदी संघटनांच्या कार्यकर्ते मोचेकर्‍यांना मदत करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -