घरमहाराष्ट्रकपिल पाटील दुतोंडी तर मनीषा कायंदे सभागृहात नवख्या - विनोद तावडे

कपिल पाटील दुतोंडी तर मनीषा कायंदे सभागृहात नवख्या – विनोद तावडे

Subscribe

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक झालेल्या विनोद तावडे यांनी कपिल पाटील यांना सभागृहात चक्क दुतोंडी बोलत मनीषा कायंदे या सभागृहात नवख्या असल्याचे म्हटले.

कायम विनाअनुदानित शाळांच्या लक्षवेधीच्या मुद्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आक्रमक झालेल्या शिक्षण मंत्र्यांना आपण सभागृहात काय बोलतो याचे भान न राहिल्याचे चित्र सभागृहात दिसले. गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक झालेल्या तावडे यांनी कपिल पाटील यांना सभागृहात चक्क दुतोंडी बोलत मनीषा कायंदे या सभागृहात नवख्या असल्याने त्यांना सभागृह समजायला वेळ लागेल, अशी खोचक टीका केली. दरम्यान, विनोद तावडे यांनी सभागृहात वापरलेल्या दुतोंडी शब्दावर कपिल पाटील यांनी आक्षेप घेत हा दुतोंडी शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यामुळे हा शब्द तपासून शब्द काढून टाकण्याचे तालिका सभापतींनी निर्देश दिले.

वाचा : दुधात भेसळ केल्यास जन्मठेपेची शिक्षा – गिरीश बापट

- Advertisement -

म्हणून तावडे झाले आक्रमक

शिक्षक गेली ७ ते ८ वर्ष शाळेत कमी आणि आझाद मैदानात जास्त असतात. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षणाची काय अवस्था असेल, असा आरोप शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केला. त्यातच कपिल पाटील यांनी आता शिक्षण खात्याला फाशी देण्याची वेळ आली, असे वक्तव्य लक्षवेधीदरम्यान करत शिक्षण विभागावर ताशेरे ओढल्याने विनोद तावडे चांगलेच संतापले. त्यामुळे संतापलेल्या शिक्षणमंत्र्यांची उत्तर देताना हे वादग्रस्त वक्तव्य केले.

वाचा : मराठा आरक्षणाबाबत शिफारशी स्वीकारल्या, अहवाल नाही – मुख्यमंत्री

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले शिक्षणमंत्री

कपिल पाटील अधिवेशनादरम्यान प्रत्येकवेळी वेगवेगळी भूमिका मांडतात. त्यामुळे सभागृहात हा दुतोंडीपणा चालणार नाही. तर काही मनिषा कायदे यक सभागृहात नवख्या असल्याने त्यांना सभागृह कळायला वेळ लागेल, असा टोला तावडे यांनी यावेळी लगावला.

वाचा : इतके लाचार होऊ नका; महाराजांच्या पोशाखाची शान राखा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -