घरमहाराष्ट्रमातोश्री -2ला काय नाव देणार? आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर भाजपाचा पलटवार

मातोश्री -2ला काय नाव देणार? आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर भाजपाचा पलटवार

Subscribe

मुंबई : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यालय दिले आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपा यांच्यात शब्दयुद्ध रंगले आहे. मंत्री लोढा यांच्या कार्यालयाला नाव काय देणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यावर भाजपाने ‘मातोश्री -2’ला काय नाव देणार? असा प्रश्न करून पलटवार केला आहे.

- Advertisement -

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेला पत्र पाठवून नागरिक कक्षाची स्थापना करण्याच्या दृष्टीने मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना महापालिकेत जागा उपलब्ध करून दिली. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याला आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्षीय कार्यालय बंद असताना पालकमंत्र्यांना कार्यालय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुंबई भाजपाने, मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नागरिक सुविधा कक्ष सुरू केला आहे. मुंबईकरांना न्याय मिळू नये अशी तुमची इच्छा आहे का? प्रतिप्रश्न केला.

हेही वाचा – ‘त्या’ कार्यालयाला नाव काय देणार? आदित्य ठाकरे यांचा भाजपाला खोचक सवाल

- Advertisement -

आज, शनिवारी पुन्हा आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत, लोढा नवीन कार्यालयाचे नाव काय ठेवले जाईल? अप्पर बीएमसी का? असा खोचक सवाल केला आहे. त्यावर पुन्हा भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. कंत्राटदार आणि बिल्डर यांच्याकडून वसुली करून ज्यांचे घर चालते, ते आज ज्ञान पाजळत आहेत. तुमच्या शाळेच्या फीपासून रेंज रोव्हर गाडीपर्यंतचे पैसे कोठून आले, ते सांगा. याच कंत्राटदार आणि बिल्डर यांच्याकडून 2 टक्के ‘कट’ घेत-घेत इथपर्यंत तुम्ही आला आहात… तुम्ही जास्त ज्ञान पाजळले नाही तर चांगले होईल, असे मोहित कम्बोज यांनी म्हटले आहे. शिवाय, कोट्यवधी रुपयांचे ‘मातोश्री 2’ जे नवे बनले आहे, त्याला नाव काय देणार… दोन टक्के (टके 2)! अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -