घरताज्या घडामोडीसंजय राऊतांचे आरोप बिनडोक, तरीही सुरक्षा पुरवणार; फडणवीसांचं वक्तव्य

संजय राऊतांचे आरोप बिनडोक, तरीही सुरक्षा पुरवणार; फडणवीसांचं वक्तव्य

Subscribe

‘मागील काळात आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचो. पण आता बिनडोक आरोप ते करत असून, त्याला काय प्रत्युत्तर द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. (What will give response to Sanjay Raut headless allegations Counterattack of dcm devendra Fadnavis)

“संजय राऊत यांना अलिकडच्या काळात प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण रोज कुठला तरी आरोप करायाचा. एक पुरवा त्यांच्याकडे नाही. मागील काळात आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचो. पण आता बिनडोक आरोप ते करत असून, त्याला काय प्रत्युत्तर द्यायचे असा प्रश्न निर्माण होतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“मला वाटते ही सनसनाटी राऊत निर्माण करत आहेत, त्याने काहीच फायदा होणार नाही. असे केल्याने त्यांना वाटते की आपल्याला सिंपती मिळेल. पण रोज खोटं बोलल्याने कधीच सिंपती मिळणार नाही. त्यांचे काय सुरू आहे, याकडे लोकांचे चांगलं लक्ष्य आहे. त्यामुळे असे चुकीचे आरोप लावल्याबद्दल उद्या त्यांच्यावरच कोणीतरी कारवाई करेल, असे मला वाटते”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राऊतांचा लिहिलेल्या पत्रावर फडणवीसांचे उत्तर

“सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय अशाप्रकारचे आरोप करणे हे त्याहीपेक्षा चुकीचे आहे. त्यामुळे संजय राऊत असो वा इतर कोणी असो त्या संदर्भात कोणालाही असुरक्षित वाटत असेल तर, ती असुरक्षितता निश्चित आहे का? त्या सुरक्षा देण्याची काही गरज आहे का? या संदर्भातील सगळी कारवाई ही एक समिती करते. कुणालाही सुरक्षा देण्याचे काम मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत नसतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही कमिटी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असून, त्यामध्ये होम सेक्रेटरी, मुंबईचे डीजी, मुंबईचे सीपी यांचा समावेश आहे. त्यामुळे राऊतांच्या पत्राची दखल ही कमिटी घेईल. त्यानंतर आवश्यक असलेली सुरक्षा त्यांना पुरवली जाईल. याबाबत आपण महाराष्ट्रात कधीच राजकारण करत नाही”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मला गुंड बोलण्याचा अधिकार कोणी दिला? राजा ठाकूर राऊतांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -